नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या ३-या वर्धापन दिननिमीत्त १५ सप्टेंबर ते०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत २५ सप्टेंबर रोजी ‘सर्वत्र स्वच्छता’: शहरातील हॉस्पिटल्स, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव व स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणेबाबत उपक्रम राबविण्यात आले.
त्याअनुषंगाने २६ सप्टेंबर रोजी कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रामध्ये सर्वत्र श्रमदान या उपक्रमाअंतर्गत धारण तलाव, स्व. अण्णासाहेब पाटील उद्यानामध्ये व पुतळा, सेक्टर-३ येथील चिकलेश्वर बस स्थानक तसेच राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळ या कंपनीमधील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या लोकसहभागातुन अशा विविध ठिकाणी स्वच्छता करुन श्रमदान करण्यात आले. सदर कार्यक्रमावेळी कोपरखैरणे विभागामधील विभाग अधिकारी तथा सहा. आयुक्त अशोक मढवी, एन.एस.आय.सी असोशिएशनचे अध्यक्ष गोपी, स्वच्छता अधिकारी प्रल्हाद खोसे, सुधीर पोटफोडे, दिनेश वाघुळदे, स्वच्छता निरीक्षक सुषमा पवार, बेंडाळे, साळसकर, माळी कामगार, जेष्ठ नागरिक, स्वच्छग्रही व स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.
२६ सप्टेंबर रोजी कोपरखैरणत विभाग कार्यक्षेत्रामधील नागरी आरोग्य केंद्र, बोनकोडे व नागरी आरोग्य केंद्र, पावणे याठिकाणी रुग्णालयाची विशेष स्वच्छता करण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये रूग्णालयामध्ये अंतर्गत व परिसरात विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्वच्छता मोहिमेच्या वेळी संबंधित रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी रूग्ण व परिसरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन केले. सदर विशेष स्वच्छता मोहिमेमध्ये डॉ.नारायण, डॉ.बारापत्रे, आरोग्य अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, उप निरिक्षक, स्वच्छाग्रही तसेच स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.
२६ सप्टेंबर रोजी नेरुळ विभाग कार्यक्षेत्रातील शिवाजी नगर या झोपडपट्टी भागामध्ये नेरुळ कार्यक्षेत्रामध्ये शिवाजी नगर येथील झोपडपट्टी भागामध्ये एस.आय.ई.एस (ड.ख.ए.ड.) महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटमधील विद्यार्थ्यांनी व नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.१६ च्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे व पथनाटयाचे आयोजन करुन स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी मोहिम राबवुन ओला कचरा-सुका कचरा वर्गिकरण करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे, प्लास्टीकच्या पिशविचा वापर न करणेबाबत मार्गदर्शन केले. या मोहिमेमध्ये नेरुळ विभागातील सहा. आयुक्त चंद्रकांत तायडे, स्वच्छता निरिक्षक अरुण पाटील, उप स्वच्छता निरीक्षक योगेश पाटील, नवनाथ ठोंबरे, शिक्षक, शालेय विद्यार्थी, शालेय, कर्मचारी व स्वच्छाग्रही, स्थानिक रहिवाशी सहभागी झाले होते.