सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला नवरात्र उत्सवाची रंगत वाढत चालली असून नेरूळ सेक्टर सहामधील शिवसेना पुरस्कृत आणि भगवती महिला मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सवास मंगळवारी (दि. २५ सप्टेंबर) शिवसेनेच्या विविध नेत्यांनी हजेरी लावली. आयोजकांच्या परिश्रमाला शाबासकीची दाद देत नेतेमंडळीं बराच वेळ नवरात्र उत्सवामध्ये रममाणही झाली.
समाजसेविका सौ. समुद्राताई पाटील आणि समाजसेवक प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षे या परिसरात नवरात्र उत्सव साजरा होत असून स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने गरबा व दांडिया खेळण्यासाठी येत असतात.
मंगळवारी शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, शिवसेनेचे बेलापुर संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे, परिवहन सदस्य समीर बागवान, माजी नगरसेवक सतीश रामाणे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी झाले होते. उत्सवाचे आयोजक प्रल्हाद पाटील आणि शिवसेनेेचे प्रभाग ८६चे शाखाप्रमुख दिलीप आमले यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्यांचे स्वागत केले. शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी उपस्थित जनसमुदायाला नवरात्रौत्सवाच्या आणि दसर्याच्या शुभेच्छा दिल्या.