सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
* शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवेंनी साधला तात्काळ पालिकेशी संपर्क
* अवघ्या १० मिनिटात पालिका कर्मचारी घटनास्थळी दाखल
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा आणि चारमधून जाणार्या मुख्य वर्दळीच्या रस्त्यावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरमधील पथदिव्यामध्ये सांयकाळी पावणेसातच्या सुमारास अचानक आग लागली. यामुळे रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी असलेल्या शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे यांनी तात्काळ पालिका प्रशासनाशी संपर्क साधत पथदिव्यातून निर्माण झालेल्या आगीची कल्पना दिली. पालिका कर्मचारी अवघ्या दहा मिनिटातच घटनास्थळी दाखल झाल्यामुळे दुरूस्तीचे कामही तात्काळ सुरू झाले. रस्त्यावरील सर्वच पथदिव्यांची वीज खंडीत केल्यामुळे रस्ता अंधारमय झाल्याचे पहावयास मिळाले.
सारसोळे गावात प्रवेश करण्याच्या मार्गावरील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गाच्या विरूध्द दिशेला आणि पलिकडील एसबीआय बॅकेच्या समोर रस्त्याच्या डिव्हायडरमध्ये असलेल्या पथदिव्यामध्ये ही आगीची घटना घडली. पथदिव्याला चिटकून असलेल्या छोटेखानी बॉक्समध्ये अचानक वायरींचा स्पार्क होवून ठिणग्या उडाल्या व काही क्षणातच आग निर्माण झाली. या आगीमुळे रस्त्यावरील सुरूवातीला तीन-चार पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला आणि त्यानंतर रस्त्यावरील अनेक पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरमधील पथदिव्यातून आग दिसताच शेजारून जाणार्या वाहचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. शिवसेनेचे माजी नगरसेवक व पालिकेतील शिवसेनेचे माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे हे त्यावेळी घटनास्थळी होते. त्यांनी तात्काळ पालिका कर्मचार्यांशी संपर्क साधत पथदिव्यातील आगीची कल्पना दिली. यावेळी बघ्याची गर्दीही झाली होती. अवघ्या दहा मिनिटातच पालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी आली. त्यांनी रस्त्यावरील सर्वच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करून दुरूस्तीच्या कामाला सुरूवात केली. यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी रस्त्यावरून ये-जा करणार्या संबंधितांना दिलासा देत पालिकेला संपर्क केल्यामुळे ही दुर्घटना आटोक्यात आली.