निलेश मोरे
मुंबई : बनारस हिंदू विद्यापीठात युवतीनी छेडछाडी विरोधात सुरु केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यात अनेक युवती जखमी झाल्या होत्या. या घटनेनंतर देशात राजकीय वातावरण तापले असता बीएचयु प्रशासन आणि भाजपा सरकार विरोधात विरोधकानी घोषणाबाजी सुरु केली आहे . बनारस हिंदू विद्यापीठातील युवतीवर छेडछाड झाल्या नंतर राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (आरएसएस) चे इंद्रेश कुमार यांनी बीएचयु चे प्राध्यापक गिरीश त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांची बाजू घेऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असता संघ आणि त्रिपाठी विरोधात मुंबई युथ कॉंग्रेसचे मुंबई उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी मुंबई प्रेस क्लब येथे नारेबाजी करून प्राध्यापक गिरीश त्रिपाठी यांनी संघाची खाकी रंगाची चड्डी कुरिअरने पाठवण्यासाठी आंदोलन केले.
मुलींवर होत असलेल्या छेडछाडी प्रकरणावर कारवाई करायचे सोडून संघ या प्रकरणावर पाणी सोडून छेडछेड करणार्यानाच प्रोत्साहन देत आहे . त्यामुळे संघाचे स्त्रियांबाबतीचे विचार आता स्पष्ट होत आहे . प्राध्यापक त्रिपाठी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा संघाची खाकी चड्डी घालून संघाचे कार्य करावे यासाठी बुधवारी युथ कॉंग्रेसकडून त्रिपाठी यांना संघाची खाकी चड्डी कुरिअरने पाठवण्यात येत असल्याचे युथ कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सूरज सिंग ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.