सुजित शिंदे ़: ९६१९१९७४४४
नवी मुंबई : गुंतवणूकदारांच्या विश्वासाला पात्र ठरल्यामुळेच सहकार क्षेत्रात कुलस्वामी पतसंस्थेचा वेलु गगनावरी चालला आहे. कुलस्वामी पतसंस्थेच्या ऐरोली शाखेचे उद्घाटन ३ ऑक्टोबरला मनसेचे आमदार व कुलस्वामीचे संचालक शरददादा सोनवणे यांच्या हस्ते होत असून ऐरोलीचे आमदार व नवी मुंबईचे ओबामा म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखले जाणारे युवा आमदार संदीप नाईक या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
ऐरोली सेक्टर ४ येथील फायर ब्रिगेड ऑफिसजवळ रो हाऊस नं सी/३ या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा होत असून नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, नगरसेवक एम.के.मढवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, मुंबै बँकेचे संचालक नितीन बनकर, स्थायी समिती सदस्य देविदास हांडेपाटील, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका हेमांगी सोनावणे हे प्रमुख पाहूणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास नवी मुंबई महापालिकेतील विविध समित्यांचे सभापती, स्थायी समिती सदस्य, नगरसेवक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, बाजार समितीमधील पदाधिकारी व व्यापारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास ऐरोलीतील रहीवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुलस्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकरशेठ पिंगळे यांनी केले आहे.