सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळमधील भाविकांसाठी श्रध्दास्थान असणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असणार्या नेरूळ सेक्टर २ आणि ८ मधील शिवसेना पुरस्कृत नवरात्रौत्सवातील देवीच्या भंडार्याचे शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यंदाच्या उत्सव कमिटीचे अध्यक्ष शरद पाजंरी यांनी दिली.
नेरूळ सेक्टर २ आणि ८ मधील शिवसेना पुरस्कृत नवरात्र उत्सव नेरूळ सेक्टर ८ मधील एल मार्केट परिसरात गेल्या २७ वर्षापासून आयोजित केला जात असून या देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते. शिवसेना नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे, शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी, विभागप्रमुख गणेश घाग, उपविभागप्रमुख मनोज चव्हाण, माजी नगरसेवक रतन नामदेव मांडवे, महिला विभाग संघटक सौ. सत्वशीला जाधव, सौ. रेश्मा वेर्गुलेकर, शाखाप्रमुख राजेश पुजारी, गणेश कुलकर्णी, बाळू घनवट आदी या नवरात्रौत्सवाचे मार्गदर्शक असून शिवसेना उपनेते विजय नाहटांसह शिवसेना पदाधिकार्यांनी या नवरात्र उत्सवाला आतापर्यत भेट दिली आहे.
हा नवरात्र उत्सव यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे अध्यक्ष शरद पाजंरी, सचिव राहूल जगदाळे, खजिनदार मंगेश शिवतरकर, उपाध्यक्ष विठ्ठल पाटणे, उपसचिव भास्कर बागल, उपखजिनदार निखिल नेटके, युवा सेनेचे बेलापुर विधानसभेचे उप विधानसभा अधिकारी निखिल रतन मांडवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, महिला आघाडीच्या सदस्या परिश्रम करत आहेत.
शुक्रवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सांयकाळी ४ वाजता होमहवन आणि सांयकाळी ७ वाजता देवीच्या भंडार्याचे आयोजन करण्यात आले असून रहीवाशांनी मोठ्या संख्येेने भंडार्यात सहभागी व्हावे असे आवाहन उत्सवाचे अध्यक्ष शरद पाजंरी यांनी केले आहे.