महागाई, इंधन दरवाढीविरोधात नवी मुंबई राष्ट्रवादीतर्फे निषेध आंदोलन
नवी मुंबई : मोदी सरकार हाय-हाय, भाजपा-शिवसेना सरकार हाय-हाय, महागाईचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या अपयशाचा धिक्कार करण्यात आला. अच्छे दिनचे दाखविलेले गाजर, राज्यात वाढलेली महागाई, शेतकर्यांच्या वाढत्या आत्महत्या, न झालेली कर्जमुक्ती, इंधनाचे भडकलेले दर, आरोग्य सेवेचा उडालेला बोजवारा, रेल्वेचा जीवघेणा प्रवास, कुपोषण त्याच बरोबर टोलनाके, व नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांच्या मुलांची बंद झालेली शिष्यवृत्ती या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्यावतीने वाशी येथील शिवाजी चौकात रविवारी सकाळी जोरदार धिक्कार आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी चुलीवर स्वयंपाक करुन महागाई, सिलेंडर आणि इंधन दरवाढीचा निषेध केला. नवी मुंबईकरांना सोसावा लागणारा टोलभार, प्रकल्पग्रस्तांवर सिडकोकडून होणार्या अन्यायाचा निषेध करण्यात आला.
बोलघेवड्या राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी संपूर्ण राज्यात राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईतही रविवारी हे आंदोलन पार पडले.
या निषेध मोर्चात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, महापौर सुधाकर सोनावणे, राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सूतार, महिला जिल्हा अध्यक्षा माधुरी सूतार, महिला सेवादलाच्या जिल्हा अध्यक्षा आशाताई शेगदार, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र इथापे, जिल्हा उपाध्यक्ष परशुराम ठाकूर, राष्ट्रवादी व्हि.जे.एन.टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुंदरलाल जाधव, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील, राष्ट्रवादीचे पालिकेतील पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक विनोद म्हात्रे, नगरसेवक लिलाधर नाईक, नगरसेवक गिरीष म्हात्रे, नगरसेविका संगीता बोर्हाडे, नगरसेविका तनुजा मढवी, नगरसेविका उषा भोईर, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, माजी नगरसेवक कोंडीबा तिकोने त्याच बरोबर राष्ट्रवादी युवकचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राजेश मढवी, सेवादल उपाध्यक्ष मोहन बोबडे, सेवादल उपाध्यक्ष दिनेश म्हात्रे, फ-प्रभाग समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, राष्ट्रवादीचे वॉर्ड अध्यक्ष अर्जुन कोरडे, वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर, वॉर्ड अध्यक्ष सुभाष बोरकर वॉर्ड अध्यक्ष केशव ठाकूर, वॉर्ड अध्यक्ष गणपतबुवा भोपी, वॉर्ड अध्यक्ष विजय साळे, राष्ट्रवादी सोशल मिडीया सेलचे शिरीष वेटा, विठ्ठल बांगर त्याच बरोबर समाजसेवक श्रीधर मढवी, समाजसेवक नरेंद्रसिंह राठोड, अफसर इमाम, राजू शर्मा, बाबुलाल कुरेशी, त्याच बरोबर राष्ट्रवादी युवक, महिला सेल, सेवादल, अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी आदी मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
अच्छे दिनचे गाजर दाखवित जनतेची फसवणूक करणार्या केंद्रातील एनडीए व राज्यातील युती सरकारचा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक यांनी समाचार घेतला. सत्ता मिळविण्याकरीता अच्छे दिनचे गाजर दाखविण्यात आले. सत्तेवर आल्यानंतर सर्व सामान्य नागरिकांना अच्छे दिन आले का? असा प्रश्न डॉ.नाईक यांनी केला. राज्यात भाजपा-सेना सत्तेवर आहे. मात्र शिवसेना शेतकर्यांची कर्जमुक्ती, वाढती महागाई, कुपोषण, पेट्रोल-डिझेल दर वाढीवर नागरिकांच्या बाजूने बोलत नाही, सत्तेत राहून बाहेर फळे चाखायची ही शिवसेनेची दुटप्पी भुमिका असल्याची टिका त्यांनी केली. मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीचा देशाच्या सर्वांगिण विकासावर विपरीत परिणाम होणार असल्याची भीती डॉ.नाईक यांनी व्यक्त केली. जी.एस.टी.ने उद्योग क्षेत्राचे आणि व्यापारी वर्गाचे कंबरडे मोडले आहे. रिलायन्स सारख्या कंपनीतील साडेचार हजार नागरिक स्पेक्ट्रमच्या भाववाढीमुळे बेकार झाले आहेत. ही स्थिती देशाला अधोगतीकडे नेणारी आहे असे डॉ.नाईक म्हणाले. जीव मुठीत धरुन रोज प्रवास करणार्या प्रवाशांना साधी लोकलची सुविधा प्रथम द्या मगच बुलेट ट्रेन ट्रेन आणा, अशी मागणी करीत मुंबईतील लोकलच्या अपघाताच्या घटनेचा डॉ.नाईक यांनी निषेध केला.
महागाईने सर्वसामान्य नागरिकांना जगावे कसे? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या अराजक भुमिकेचा निषेध करण्यासाठी आजचे आंदोलन करण्यात आल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अनंत सूतार यांनी सांगितले. खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवायची आणि नंतर जनतेला वार्यांवर सोडायचे हेबसेना-भाजपे षडयंत्र असल्याचे सूतार म्हणाले. बुलेट ट्रेन नको असे सांगून सुखकर प्रवास देण्यात तसेच नवी मुंबईकरांना टोल मुक्त करण्यातही राज्य सरकारला अपयश आले आहे, या सारखे दुर्देव आणखी काय आहे? अशी टिका देखील सूतार यांनी केली. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी घेऊन सिडकोने त्यांना भुमिहीन केले आहे. साडेबारा टक्के भुखंड वाटपाच्या निर्णयाची १०० टक्के अंमलबजावणी पुर्ण होत नाही तोपर्यत प्रकल्पग्रस्तांच्या कोणत्याही योजना सिडकोने बंद करु नये, अन्यथा राष्ट्रवादी सिडकोच्या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हाध्यक्ष सूतार यांनी दिला.
भाजीपाला, कपडे आणि दैनंदिन वापरातील वस्तूंवर जीएसटी लावून वस्तूंची भाववाढ केल्याने नागरिकांना महागाईची तीव्र झळ सोसावी लागत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर आवाढव्य वाढविण्यात आल्याने सरकारचा निषेध म्हणून पारंपारिक पध्दतीने चुलीवर जेवण करुन राष्ट्रवादीच्या महिलांकडून सरकारच निषेध करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या महिला सेलच्या जिल्हा अध्यक्ष माधुरी सुतार यांनी सांगितले. मोदी सरकार हे फेकू सरकार आहे. आधुनिकतेच्या नावावर सरकार देशाला प्रगतीकडे नाही तर अधोगतीकडे नेत असल्याची टिका सूतार यांनी केला. दिवाळी सणाच्या पार्श्वभुमीवर महागाईची झळ सर्व सामान्यांना सोसावी लागत असून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधी दैनंदिन वस्तूंची भाववाढ कमी करावी, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला व कार्यकर्त्यांनी दिला.
फोटो ओळ— धिक्कार आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजीव गणेश नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सूतार, महापौर सुधाकर सोनावणे, माजी महापौर सागर नाईक, आदी तर दुसर्या छायाचित्रात चुलीवर स्वयंपाक करुन गॅस दरवाढ व महागाईचा निषेध करताना महिला अध्यक्षा माधुरी सूतार, स्थायी समितीच्या सभापती शुभांगी पाटील व महिला पदाधिकारी आणि नगरसेविका.