स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६ / ८०८२०९७७७५
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्र्रेसचे प्रभाग ५५ चे युवा नगरसेवक मुनवर पटेल यांच्या अथक प्रयत्नामुळे कोपरखैराणेवासियांना ‘ओपन जीम’ची सुविधा उपलब्ध झाली आहे.
कोपरखैराणे, सेक्टर ११ मधील स्थानिक रहीवाशांच्या चालण्याच्या मार्गिकेवर (वॉकिग ट्रॅक) नगरसेवक मुनवर पटेल यांच्या प्रयत्नामुळे ओपन जीमची सुविधा निर्माण झाली आहे. स्थानिक परिसरातील रहीवाशांच्या शरीर स्वास्थ्याचा दृष्टीकोनातून आपण ओपन जीम बसविण्याचा निर्णय घेवून पाठपुरावा केला असल्याचे नगरसेवक मुनवर पटेल यांनी सांगितले. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या ओपन जीमचे उद्घाटन करण्यात आले. सध्याच्या स्थितीत वाढते प्रदूषण लक्षात घेता रहीवाशांना इच्छा असून व्यायामशाळेत जावून व्यायाम करणे अथवा व्यायामासाठी वेळ देणे शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर सकाळी शुध्द हवा मिळावी यासाठी रहीवाशी सकाळी या ठिकाणी चालावयास येतात, त्यांना वेळेत वेळ काढून व्यायाम करणे शक्य व्हावे म्हणून ओपन जीमची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नगरसेवक मुनवर पटेल यांनी ‘नवी मुंबई लाईव्ह’शी बोलताना दिली.