नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशनच्या 3-या वर्धापन दिननिमीत्त 15 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर, या कालावधीत “स्वच्छता हीच सेवा” अंतर्गत स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्याअंतर्गत 10 ऑक्टोबर रोजी ‘श्रेष्ठ स्वच्छता’: शहरातील प्रसिध्द स्थळांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणेबाबत उपक्रम राबविण्यात आले.
त्याअनुषंगाने 01/10/2017 रोजी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी मोठयाप्रमाणात श्रमदान करण्यात आले. यावेळी मोहिमेमध्ये ज्वेल ऑफ नवी मंबई, नेरुळ, छत्रपती शिवाजी चौक व जागृतेश्वर मंदिर, वाशी, सेक्टर- 2 परिसर, सिबीडी बेलापुर, सानपाडा तलाव, तुर्भे, मुलूंड-ऐरोली उड्डाण पुल, ऐरोली अशा विविध ठिकाणी मोठयाप्रमाणात स्वच्छता श्रमदान करुन उपस्थित नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले. तसेच लोकमान्य तिळक कॉलेजमधील एन.एस.एस च्या विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसरात ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण व स्वच्छतेसाठी रॅली काढण्यात आली. यावेळी विभागातील सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता उप निरिक्षक, विद्यार्थि, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छाग्रहि व नागरिक मोठयाप्रमाणत सहभागी झाले होते.
त्याचप्रमाणे 02/10/2017 रोजी स्वच्छ भारत मिशनच्या 3 ऱ्या वर्धापन व महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधुन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील विविध ठिकाणी साफसफाई करुन शहरामध्ये स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे अंतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातुन नवी मंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी स्वच्छता करुन श्रमदान करण्यात आले. तसेच सिबीडी सेक्टर-8 बी, संभाजी नगर याठिकाणी स्थानिक नागरिकांच्या सहाभागने स्वच्छता मोहिम राबवुन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेमध्ये अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व उप आयुक्त (परि-1) दादासाहेब चाबुकस्वार यांनी उपस्थित नागरिकांना स्वच्छता व कचरावर्गिकरणाचे महत्व पटवुन दिले. सदर मोहिमे अंतर्गत तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर येथे महानगरपालिका शाळा क्र. 103 मधील विद्यार्थ्यांमार्फत विभागामध्ये रॅलीचे आयोजन करुन प्लॅस्टीक बंदी, कचरावर्गिकरण याबाबत संदेश देण्यात आले. तसेच घणसोली येथील मुंब्रादेवी परिसरात विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आली. यावेळी विभागातील स्थानिक नगरसेवक / नगरसेविका, सहा. आयुक्त, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरिक्षक, स्वच्छता उपनिरिक्षक, विद्यार्थि, शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वच्छाग्रहि व नागरिक सहभागी झाले होते.