स्वंयम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८६ मधील नेरूळ सेक्टर सहा परिसरातील राजमाता जिजाऊ उद्यानाचा लवकरच कायापालट होणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या उद्यानाला आलेला बकालपणा संपुष्ठात येणार असून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे स्थानिक रहीवाशांना अपेक्षित असलेले उद्यान लवकरच वापरावयास उपलब्ध होणार असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.
या परिसराचे महापालिकेच्या दुसर्या सभागृहापासून ते चौथ्या सभागृहापर्यत प्रतिनिधीत्व करणारे कार्यसम्राट नगरसेवक कै. नारायण पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे या ठिकाणी पालिका प्रशासनाला उद्यान व क्रिडागणांची निर्मिती करणे भाग पडले. हा भुखंड शाळेसाठी आरक्षित होता. १५ फेब्रुवारी २०१० रोजी या उद्यानाचे लोर्कापण झाले. या उद्यानाच्या नशिबी राजयोग फार काळ आलाच नाही. उद्यानात असलेल्या लोखंडी घसरगुंडीच्या पत्रा निकृष्ठ असल्यामुळे त्याला ठिकठिकाणी तडे गेले. त्यामुळे लहान मुलांना जखमा होण्याच्याही घटना घडल्या. घसरगुंडीच्या तळाला तर पत्रा बराच कापलाही गेला होता. दोन झोपाळ्यांपैकी एक झोपाळा तुटलाच होता. या उद्यानात संत गाडगेबाबा नागरी अभियानातर्ंगत सिमेंटचे बाकडे बसविण्यात आले होते. परंतु त्या बाकड्यांचीही अल्पावधीत दुर्रावस्था आली. बाकड्यांना तडे जाणे, लोखंडी सळ्या बाहेर येणे असे प्रकार घडले.
उद्यानातील खेळण्याची अल्पावधीत झालेली दुरावस्था पाहून कार्यसम्राट नगरसेवक नारायण पाटील यांनी तात्काळ गजोबाच्या धर्तीवर फायबरची दुसरी खेळणी बसविली. परंतु लहान मुलांच्या या खेळण्यांचा वापर लगतच्या गृहनिर्माण सोसायट्यांतील मोठी माणसेच अधिक करू लागल्याने या खेळण्याचेही तीन तेरा वाजले.
पालिका निवडणूकीनंतर या प्रभाग ८६ परिसराचे पालकत्व स्विकारलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी स्थानिक नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर यांच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मधल्या काळात उद्यानाची फाईल गहाळ होण्याचे प्रकरणही घडले. तुकाराम मुंढे आयुक्तपदी आल्यावर थंडावलेल्या विकासकामांमध्ये या उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या फाईलचाही समावेश असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.
या उद्यानाच्या सुविधांबाबत स्वत: सुरज पाटील यांनी व्यक्तिगत स्वारस्य दाखवित उद्यानात गवताचा लॉन, ओपन जीम, लहान मुलांची खेळणी यासह अन्य सुविधा स्थानिक रहीवाशांना उपलब्ध होणार आहेत. उद्यान व क्रिडांगणाचे लोर्कापण झाल्यापासून पालिका प्रशासनाचे क्रिडांगणाचा नामफलकही आजतागायत लागलेला नाही. सुरज पाटलांच्या माध्यमातून तोही लवकरच लागणार असल्याची माहिती कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज मेहेर यांनी दिली.-
या उद्यानाच्या दुरावस्थेविषयी व उद्यानालगतच असलेल्या सार्वजनिक शौचालयातील समस्येविषयी समाजसेवक प्रल्हाद नारायण पाटील महापालिका आयुक्तांकडे नुकतीच लेखी तक्रार करत या समस्येकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.