निलेश मोरे
मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले हटविण्यासोबतच स्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत रिक्षाचालकांवरही कारवाई करण्याची मागणी घाटकोपरच्या रेल्वे प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
एल्फिस्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणार्या पुलावर एका अफवेने बचावासाठी सैरवैर झालेल्या गोंधळात चेंगराचेंगरीत २३ निष्पाप नागरिकांचा बळी गेला या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर सामान्य प्रवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रशासनाच्या विरोधात आवाज उचलत ५ ऑक्टोबर रोजी रेल्वेच्या मुख्याल्यावर हजारोंचा संख्येने संताप मोर्चा काढला . या मोर्चातुन राज ठाकरे यांनी परप्रांतीय लोंढ्याना टार्गेट करत रेल्वे स्थानक आणि रेल्वे पुलावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर १५ दिवसांत कारवाई कारण्याचे प्रशासनाला निवेदना द्वारे सूचित केले . १५ दिवसांत फेरीवाले मुक्त करण्यात आले नाही तर १६ व्या दिवशी मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील अशी भूमिका घेत राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनावर दबाव आणला. दरम्यान मनसेच्या या अभूतपूर्व मोर्चा नंतर सामान्य प्रवाशानी मनसेच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. तसेच फेरीवाले यांच्यासह रेल्वे स्थानकाबाहेर उभ्या असणार्या अनधिकृत रिक्षा चालकांवर देखील सक्त कारवाई करावी अशी मागणी सामान्य रेल्वे प्रवाशी करत आहेत . फेरीवाले प्रमाणे अनधिकृत रिक्षा चालक हे रेल्वे स्थानका बाहेर बेशिस्तीत रिक्षा उभ्या करतात आणि स्थानका बाहेर शेअर रिक्षा युनियनचे स्टॅन्ड लागत असल्याने प्रवाशी शेअर रिक्षा पकडण्यासाठी रस्त्याच्या मध्य भागी उभे राहून लांबच लांब रांगा लावत असल्याने रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना रेल्वे प्रवाशाना डोके दुःखी होते आणि त्यातूनच वाहतूक कोंडीसारखा प्रश्नही निर्माण होतो . त्यामुळे रेल्वे स्थानका बाहेरील अनधिकृत उभ्या असणार्या रिक्षा चालकांवर कारवाई करा अशी मागणी आता सामान्य रेल्वे प्रवाशांकडून जोर धरत आहे .