स्वयंम न्युज ब्युरो : ८३६९९२४६४६
केरळ सरकारला सुबुद्धी आली नाही तर तीव्र आंदोलन करू :-आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : राष्ट्राला परमवैभवाकडे घेऊन जाणाऱ्या भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांची केरळमध्ये शेकड्याने अमानुष हत्या केली जात असताना केरळ सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले आहे. वारंवार राष्टप्रेमी संघटनांनी आंदोलने करूनही केरळ केरळ सरकारला सुबुद्धी आली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला आहे. रायगड जिल्ह्यात कम्युनिस्ट विचारधारेचा शेकाप आहे. विरोधी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना आयुष्यातून संपविण्याची वृत्ती कम्युनिस्टांची आहे. त्यामुळे लालबावट्याच्या या दंडेलशाहीला नेस्तनाबूत करा असा सूचक संदेशही त्यांनी यावेळी दिला. भाजप युवा मोर्चा पनवेल तर्फे आयोजित जनरक्षा यात्रा ला संबोधित करताना ते बोलत होते. केरळमधील अराजकतेकडे केंद्र सरकारने लक्ष घालून केरळ सरकारला खाली खेचावे असेही ते यावेळी म्हणाले.
केरळ मधील कम्युनिस्ट विचारांच्या सरकारद्वारे भाजपा कार्यकर्त्यांवर आणि रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारा विरोधात भाजप युवा मोर्चा पनवेल तर्फे (सोमवार,दि. ०९) ‘जनरक्षा यात्रा’ काढण्यात आली. यावेळी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील,जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन,शहराध्यक्ष जयंत पगडे,महापौर डॉ. कविता चौतमोल,उपमहापौर चारुशीला घरत,सभागृहनेते परेश ठाकूर,प्रदेश युवामोर्चा सरचिटणीस नगरसेवक विक्रांत पाटील,युवामोर्चा शहराध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले कि,भारतमातेला सर्वोच्चस्थानी नेऊ पाहणाऱया कार्यकर्त्यांच्या केरळमध्ये होत असलेल्या हत्येविरोधात हा राष्ट्रप्रेमी कार्यकर्त्यांचा एल्गार आहे. कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येविरोधात तेथील काँग्रेस सरकारला दूषणे देण्याऐवजी भाजपचीच बदनामी करण्यात आली. केरळमध्ये आरएसएस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या शेकड्यांनी हत्या होत आहेत याला जबाबदार कोण असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. केंद्र सरकारला केरळ सरकारला खाली खेचता आले असते मात्र भाजपची विचारसरणी लोकशाही मानणारी असल्याने केरळ सरकारला शहाणपण यावे यासाठी हि जनरक्षा यात्रा आहे
असेही त्यांनी स्पष्ट केले.वारंवार राष्टप्रेमी संघटनांनी आंदोलने करूनही केरळ सरकारला सुबुद्धी आली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. रायगड जिल्ह्यात कम्युनिस्ट विचारधारेचा शेकाप आहे. विरोधी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना आयुष्यातून संपविण्याची वृत्ती कम्युनिस्टांची आहे. त्यामुळे लालबावट्याच्या या दंडेलशाहीला नेस्तनाबूत करा असा सूचक संदेशही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.
पनवेल शहरात काढण्यात आलेल्या या जनरक्षा यात्रेची सुरुवात पनवेल तालुका व भाजपाच्या मध्यवर्ती कार्यालयातून झाली. पुढे शिवा जी चौक-आदर्श हॉटेल-विरुपाक्ष मंदिर-जयभारत नाका- अन्नपूर्णा नाका-गोखले हॉल-श्री लॉज-तालुका पोलीस चौकी-चिंतामणी हॉल-साई ब्लड बँक- असे मार्गक्रमण करीत शेवटी तहसिलदार कार्यालय येथे नायब तहसीलदारांना निवेदन देऊन या यात्रेचा समारोप करण्यात आला.
कोट
रक्तरंजित क्रांती हि कम्युनिस्टांची कूटनीती आहे. त्यांना काँग्रेसने सहकार्य केले म्हणून दोन्ही विचारसरणींना देशातील जनतेने नाकारले आहे. आता केरळ राज्य सुद्धा हातातून जाईल म्हणून तेथे नक्षलवाद्यांच्या साहाय्याने दहशतवाद पसरवून भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या केल्या जात आहेत त्याचा आम्ही निषेध व्यक्त करीत आहोत.केरळमध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग मूग गिळून गप्प बसला आहे. कम्युनिस्टांनी केरळची साक्षरता धुळीस मिळविली आहे. आद्यगुरू शंकराचार्य,पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या केरळ राज्यामध्ये विकासाची गंगा पोहोचवायचे काम भाजपाला करायचे आहे.
— बाळासाहेब पाटील
प्रदेश भाजप सदस्य
मानवतेला काळिमा फासणारी कृत्ये केरळमध्ये घडत आहेत. ज्याप्रमाणे निर्भयपणे देशात इतरत्र राहता येते त्याचपद्धतीने केरळ,पश्चिम बंगाल आणि ओरिसात राहता यावे हि आमची मागणी आहे. शेकापच्या झेंड्यामध्ये लाल रंग आणि विळा आहे हे शेतकरी आणि कामगारांचे प्रतीक नसून कम्युनिस्टांच्या रक्तरंजित क्रांतीची ती प्रतीके आहेत.
–विक्रांत पाटील
भाजप महाराष्ट्र प्रदेश युवामोर्चा सरचिटणीस
हुकूमशाही जास्त दिवस टिकत नाही. पनवेलमध्येसुद्धा अशीच शेकापक्षाची हुकूमशाही होती. मात्र २००९ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर निवडून आले आणि खऱ्या अर्थाने विकासाला सुरवात झाली. केरळच्या रक्षणार्थ लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून केरळ सरकारला आता पक्षपाती भूमिका घेता येणार नाही.
— जयंत पगडे
भाजप पनवेल शहराध्यक्ष