नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील गजानन कृप्पा सोसायटीतील प्रवीण तानाजी येलकर (वय ३२) हा युवक काल रात्री काश्मिरात अतिरेक्याबरोबर चकमकीत शहीद झाला आहे.
प्रवीणचे पार्थिव उद्या (दि. १३ ऑक्टोबर) त्यांच्या गावी कोल्हापुर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे लष्कराकडून येणार आहे. तिथेच अंत्यसंस्कार होणार. प्रवीणच्या पश्चात आई,वडील, पत्नी व ५ वर्षाची मुलगी आहे. आज सकाळी ४ वाजता लष्कराकडून फोन आल्यावर परिसरात शोककळा पसरली आहे. दोन महिन्यापूर्वीच सुट्टीकरिता प्रवीण नेरूळला येवून गेला होता.