नवी मुंबई: दिवाळी सणानिमित्त आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी आणि गरीब नागरिकांना मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. या सुविधेचा असंख्य आदिवासी आणि गरजु नागरिकांनी लाभ घेतला.
आ. सौ. मंदाताई म्हात्रे या गेल्या २२ वर्षापासून अशा प्रकारच्या सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. या उपक्रमामुळे गोर-गरीबांमध्ये एक आनंदाचे वातावरण परसले आहे. दरम्यान, सदर उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी आणि गरजु नागरिकांना दिवाळी सणासाठी मोठी मदत होणार असल्याचे मत आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केले. एकंदरीतच गरीबांच्या चेहर्यावरील आनंद पाहून आपली दिवाळी देखील साजरी झाल्याचे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली.
याप्रसंगी ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, सौ. आरती राऊळ, सौ. शितल जगदाळे, सौ. देवायानी मुकादम, श्रीराम घाटे, रामभाऊ मुळे, एकनाथ मगडवार, विज्ञान म्हात्रे, रवी ठाकूर उपस्थित होते.