स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५
नवी मुंबई: ‘बेलापूर’ विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून बांधण्यात आलेल्या सीबीडी बेलापूर येथील ‘सिडको बस थांबा निवारा शेड’चे उद्घाटन यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ‘संकल्प वेल्फेअर असोसिएशन’ तथा ‘ज्येष्ठ नागरिक संस्था’चे अध्यक्ष गोविंद करनानी यांच्या हस्ते २ डिसेंबर रोजी संपन्न झाले. याप्रसंगी आ. सौ. मंदाताई म्हात्रे, ‘भाजपा’चे नवी मुंबई जिल्हा महामंत्री डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, विक्रम पराजुली, नगरसेवक सुनील पाटील, दामोदर पिल्ले, कल्पना शिंदे, आरती राऊल, देवयानी मुकादम, शीतल जगदाळे, अलका कामत, संजय ओबेरॉय, संजय पवार, संतोष पळसकर, संकल्प वेल्फेअर असोसिएशन, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे पदाधिकारी-सदस्य, महिला वर्ग तसेच ‘भाजपा’चे पदाधिकारी आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.
नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमांतर्गत असलेल्या अनेक बस थांब्याची अवस्था अतिशय दयनीय होती. बस थांब्याचे नुतनीकरण आणि निवारा शेड सारख्या सुविधा प्रवाशांना उपलब्ध व्हाव्यात, याकरिता अनेक ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग यांनी ‘बेलापूर’च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मागणी केली होती. तदनंतर आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विभागातील बस थांबा ठिकाणचे सर्वेक्षण करून सदर बस थांबा निवारा शेड बांधणीकरिता आमदार निधीमधून निधी उपलब्ध करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
त्यानुसार आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघात एकूण १५ बस थांबा निवारा शेड बांधण्याकरिता निधी मंजूर करून घेतला आहे. त्यातील सीबीडी सिडको भवन येथील बसथांबा नव्याने बनवून त्याचे २ डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले.