स्वयंम न्युज ब्युरो : ८०८२०९७७७५ – 8369924646
नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या हस्ते नेरूळ गाव, महापालिका प्रभाग ९५ येथील विकासकामांचा शुभारंभ होत असून यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या प्रभागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थानिक युवा नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटी दोन लाख ६९ हजार ५०४ रूपये खर्च करून विकासकामे होणार असून या विकासकामांमध्ये नेरूळ सेक्टर २० मधील सी ब्लॉक येथे रस्ता, गटर व पदपथाची दुरूस्ती करणे, नेरूळ सेक्टर २० मधील सी ब्लॉक तसेच पुनम टॉवर ते बांचोली मैदानामागील रस्ता, बांचोली मैदान ते राम मंदिरपर्यत नेरूळ गाव या मार्गातील गटर, पदपथ व रस्त्याची दुरुस्ती करणे, यासह परिसरातील अन्य भागात गटर,रस्ते व पदपथांच्या दुरूस्तीच्या विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
या कार्यक्रमास माजी उपमहापौर व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गोपीनाथ ठाकूर हेही प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून प्रभागातील नेरूळ गाव व सभोवतालच्या परिसराच्या कायापालटाचा शुभारंभ होणार असल्याने नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन नगरसेवक गिरीश म्हात्रे यांनी केले आहे.