सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- ऐरोली मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा आमदार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचे ओबामा या नावाने ओळखले जाणारे संदीप नाईक मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी ऐरोलीतील आपल्या जनसंपर्क कार्यालयात मतदारांशी सुसंवाद साधणार आहेत.
आमदार संदीप नाईक गेल्या आठ वर्षापासून मतदारांशी सातत्याने सुसंवाद साधत आहेत. नवी मुंबईतील सर्वाधिक भागात पायपीट करणारा एकमेव नेता अशी संदीप नाईकांची नवी मुंबईकरांमध्ये प्रतिमा आहे. नगरसेवक ते आमदार अशी राजकीय वाटचाल करणार्या संदीप नाईक नवी मुंबई महापालिकेच्या तिसर्या सभागृहात स्थायी समिती सभापती म्हणून तीन वर्षे धुरा सांभाळताना ‘सभापती आपल्या प्रभागात’ हे अभियान राबविले होते. ‘आमदार आपल्या दारी ’ हे अभियान राबविताना सतत मतदारांशी सुसंवाद साधताना त्यांच्या सुविधांचा आणि समस्यांचा आढावा आमदार संदीप नाईकांनी सातत्याने घेतला आहे. स्वच्छ प्रतिमा आणि उच्चविद्याविभूषित असलेले संदीप नाईक काही प्रमाणात अबोल व मितभाषी असले तरी त्यांनी केलेली विकासकामे इतरांना दखल घेण्यास भाग पाडतात. मतदारांशी असलेला सुसंवाद, कानकोपर्यात संपर्क आणि विकासकामांचा रतीब यामुळे मोदी लाटेतही ऐरोली मतदारसंघातील मतदारांनी ‘आपली बांधिलकी लाटेशी नाही तर विकासकामांशीच आहे’ हे मतपेटीतून दाखवित संदीप नाईकांनाच आमदार म्हणून निवडून आणले आहे.
मंगळवार, दिनांक १६ जानेवारी रोजी ऐरोली येथूल जनसंपर्क कार्यालयात आमदार संदीप नाईक हे मतदारांशी सकाळी ९.३० ते सकाळी ११ या वेळेत सुसंवाद साधणार आहेत. कार्यालयात अथवा अभियानादरम्यान भेटावयास आलेल्या शेवटच्या मतदारांचे काम झाल्याशिवाय तसेच त्याच्या समस्येचे निवारण झाल्याशिवाय आमदार संदीप नाईक जागेवरून हलत नाहीत हा अनुभव मतदारांनी प्रत्यक्ष अनुभवल्याने मंगळवारी आमदार संदीप नाईकांना भेटण्यासाठी मतदारांची झुंबड उडणार असल्याचे बोलले जात आहे.