सुजित शिंदे
नवी मुंबई :- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या जंयतीनिमित्त युवा सेनेने आयोजित केलेले रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात ७१ बाटल्या रक्त संकलित झाले. नवी मुंबई महानगरपालिका रक्तपेढीने या रक्तदान शिबिरास सहकार्य केले.
युवा सेनेचे बेलापुर विधानसभा युवा अधिकारी मयुर ब्रिद यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. नेरूळ सेक्टर आठमधील एल मार्केट परिसरात बेलापुर विधानसभेचे उपयुवा अधिकारी निखिल रतन मांडवे यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ठाण्याचे खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, शिवसेना शहरप्रमुख विजय माने, माजी विरोधी पक्षनेते दिलीप घोडेकर, माजी पक्षप्रतोद रतन नामदेव मांडवे, परिवहन समिती सदस्य समीर बागवान, शिवसेना विभागप्रमुख मिलिंद सुर्यराव, पत्रकार सुर्यकांत गोडसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व युवा सेनेचे पदाधिकारी यांनी भेटी दिल्या.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक भागातील शिवसेना व युवा सेनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.