• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 21, 2018

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सानपाड्यात शिवजयंती उत्सवाचे दिमाखात आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सानपाड्यात शिवजयंती उत्सवाचे दिमाखात आयोजन

नवी मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सानपाडा विभागाच्या वतीने सानपाडा सेक्टर ८ मधील हुतात्मा बाबू गेनू सैद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवाला सानपाडा वासियांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यावेळी लोकनेते गणेश नाई साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनंत सुतार,महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार,युवकचे जिल्हाध्यक्ष सूरज पाटील,स्थानिक नगरसेविका संगीता बोऱ्हाडे,ज्येष्ठ पत्रकार अनंत पाटील, टीव्ही ९ मराठी न्यूज चॅनेलचे पत्रकार योगेश शेटे आदी उपस्थित होते.

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यावेळी चमचा लिंबू स्पर्धा ,बादलीत बॉल टाकणे स्पर्धा यांसारखे विविध खेळ महिलांसाठी खेळविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. प्रत्येक सेक्टरसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या लकी ड्रॉ मधील विजेत्या १० महिला स्पर्धकांना पैठणींचे वाटप करण्यात आले. सानपाडा सेक्टर ७ मधील न्यू अवधूत सोसायटीतील सुनीता माने यांनी मानाची सोन्याची नथ मिळविण्याचा मान पटकाविला. नवी मुंबई महानगर पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळावा या उद्देशाने हळदी कुंकू समारंभात सानपाडा विभागातील दोन हजार महिलांना वाण म्हणून कचऱ्याच्या कुंड्यांचे वाटप करून जनजागृती करण्यात आली. यावेळी लोकगीते,पोवाडे,नाटक,लावणी,नृत्य,कोळी गीते यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले. लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सानपाडा – जुईनगर तालुकाध्यक्ष दिलीप बोऱ्हाडे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सानपाडा प्रभाग क्रमांक ७४ चे वॉर्ड अध्यक्ष राजेश ठाकूर, समाजसेवक सुनिल कुरकुटे या आयोजकांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहेःखा. अशोक चव्हाण

Next Post

थेट बँक खात्यात रक्कम जमा करा – मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

Next Post
थेट बँक खात्यात रक्कम जमा करा – मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

थेट बँक खात्यात रक्कम जमा करा - मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

24 व 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धा

24 व 25 फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महापौर चषक 40+ क्रिकेट स्पर्धा

घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी  महाआरोग्य शिबिर

घणसोली मधील श्री प्रतिष्ठा सामाजिक सेवा संस्थाच्या वतीने रविवारी महाआरोग्य शिबिर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com