दिपक देशमुख
नवी मुंबई :- नेरूळमधील बामणदेव व झोटींगदेव मैदानावर रविवार, दि. १८ मार्च रोजी नेरूळ गावातील कुळाचे क्रिकेट सामने रंगणार असून नेरूळ नोडमधील क्रिकेटप्रेमींना मर्यादीत षटकांचा क्रिकेट थरार पहावयास मिळणार आहे.
नेरूळ गावामध्ये पाटील, भोपी, भगत, ठाकूर, मढवी, सुतार, कडू, म्हात्रे, भोईर, घरत आदी कुळांमध्ये हे ‘नेरूळ गाव चषक- २०१८’ अर्ंतगत ‘टॉस का बॉस’अर्ंतगत कुळाच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून गावातील युवकांमध्ये एकोपा वाढीस लागावा, आपसातील मतभेद, संघर्ष संपुष्ठात यावे, परस्परात सुसंवाद वाढीस लागावा या हेतूने गेल्या काही वर्षापासून नेरूळ गावातील युवकांनी पुढाकार घेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यास सुरूवात केली आहे.