ठाणे – प्रतिनिधी
स्थानिक खासदार राजन विचारे व शिवसेना नेते खासदार आनंदराव आडसूळ यांच्या अथक प्रयत्नाने विदर्भातील नागरिकांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात विदर्भ एक्सप्रेस व अमरावती एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा मिळाला .या गाडीचे ज्लोषात स्वागत करून विदर्भ समाज संघ व खासदार राजन विचारे यांच्या प्रमुख उपस्थित विदर्भ पुत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून गाडी रवाना केली त्यावेळी विदर्भ समाज संघाचे पदधिकारी दिनेश देशमुख घनश्याम भुयार व सन्मानीय नगरसेवक ,विभागप्रमुख ,शिवसेना पदधिकारी मोठ्या संखेने उपस्तीत पार पडला .
गेल्या अनेक वर्षापासून हि मागणी होत होती . विदर्भ समाजाने खासदार राजन विचारे यांच्या कडे मागणी केली होती . यासाठी खासदार राजन विचारे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचाय्कडे मागणी केली होती .मात्र निवडणुकीच्या तोंडावर आल्यावर या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे ठाणे व नवी मुबई , विदर्भातील नागरिकांना कल्याण येथे न जाता आता ठाण्यात गाडी पकडू शकतात .