ठाणे, :- मुंबई ते गोदिंया (विदर्भ) एक्सप्रेस आणि मुंबई ते अमरावती (अमरावती) एक्सप्रेसने गावी जाण्यासाठी ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथे वास्तव्यास असणार्या नागरिकांना मोठी कसरत करीत कल्याण किंवा मुंबई रेल्वे स्थानकात गाडी पकडण्यासाठी जावे लागत होते. ही बाब लक्षात ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ.संजीव गणेश नाईक यांनी खासदारकीचा कार्यकाळ ते आतापर्यत ९ वर्ष या दोन्ही एक्सप्रेसह इतर राज्यात जाण्यार्या एक्सप्रेसला ठाणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा ही मागणी लावून धरत केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला होता. डॉ.नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले असून विदर्भ व अमरावती एक्सप्रेसला सोमवारपासून थांबा देण्यात आला आहे. डॉ.नाईक यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि विदर्भ समाज प्रवासी संघ, रेल्वे प्रवासी संघाचे पदाधिकार्यांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानत एक्सप्रेसचे ठाणे स्थानकात जोरदार स्वागत केले. यावेळी बोलताना डॉ.नाईक यांनी २२ वर्षापासून लढा देणार्या विदर्भ समाज बांधवांची मागणी पुर्ण झाल्याबद्ल त्यांनी आनंद व्यक्त केला. एखाद्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा जनतेची कामे झाल्याबद्ल समाधानी असल्याचे सांगताच स्थानकात उपस्थित प्रवाशांनी डॉ.नाईक यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
जे पेरले, ते उगवते! असा अनुभव सध्या ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर येथील रेल्वे प्रवाशांना येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ.संजीव गणेश नाईक त्यांच्या कारकिर्दीत केंद्र सरकारकडे मांडलेल्या प्रवाशांच्या समस्यांची पुर्तता झाली असून अनेक समस्यांच्या तांत्रिक बाबीची पुर्तता होऊन मागण्या पुर्ण होत आहेत. ठाणेकरांना भविष्यात वाढत्या गर्दीचा सामना करावा लागू नये यासाठी उभारलेला ठाणे रेल्वे स्थानकातील सॅटीस जोड पुल, ठाणे रेल्वे स्थानकात साकारलेले देशातील पहिले सरकते जीने, प्रवाशांसाठी बनविण्यात आलेले पहिले वातानुकुलित शौचालय, ठाणे रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता मनोरुग्णालयाच्या जागेत दुसरे रेल्वे स्थानक उभारण्याच्या कामाकरीता सुरु झालेली तांत्रिक प्रक्रीया, ठाणेकरांसाठी १२ डब्ब्या ऐवजी १५ डब्ब्याच्या लोकल, वातानुकुलित लोकल, मध्य व ट्रान्स मार्गावरील लोकलच्या फेर्या वाढविणे, अशा लोकोपयोगी प्रश्नांची मागील चार वर्षापासून पुर्तता होताना दिसत आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या खासदारकीच्या कारकिर्दीत डॉ.संजीव गणेश नाईक यांना ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर येथे वास्तव्यास असणार्या नागरिकांनी आणि विदर्भ समाज संघाने एक्सप्रेसला ठाण्यात थांबा देण्यासाठी निवेदन दिले होते. या शहरातून हजारो नागरिक या एक्सप्रेसने प्रवास करीत असताना त्यांना केवळ गाडी पकडण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता ठाणे रल्वे स्थानकात थांबा देण्याची मागणी खासदारकीच्या कालखंडात तत्कालीन रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी, मल्लिकाअजुर्न खरगे यांना सन-२०१५ मध्ये विद्यमान केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश मंत्री यांची त्याच बरोबर रेल्वे बोर्डाचे मुख्य प्रबंधख यांनी स्वत: जाऊन भेट घेऊन हा प्रश्न लावून धरला होता. त्याच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळेच ठाणे रेल्वे स्थानकात विदर्भ आणि अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळाला आहे. काल सोमवार २ एप्रिल रोजी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थिती या एक्सप्रेसचे स्वागत करण्यात आले. डॉ.नाईक यांनी रेल्वे प्रशासनाने आपली मागणी पुर्ण केल्याबद्ल रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांचे आभार मानले.