नवी मुंबई :- ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेस अध्यक्ष निशांत करसन भगत यांचा वाढदिवस नवी मुंबई कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यंाच्या मार्गदर्षनाखाली नवी मुंबईत विविध सामाजिक उपक्रमांच्या आयोजनाद्वारे आपल्या वाढदिवसाचा आनंद समाजातील विविध घटकांसाठी आनंददायी व लाभदायक ठरावा अशा रितीने साजरा करण्यात आला.
मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाशी रेल्वे स्टेशनजवळ महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये तेरणा हॉस्पिटल, नेरूळ व मॉं साहेब मीनाताई ठाकरे रक्तपेढी, नमुंमपा हॉस्पिटल सेक्टर १०, वाशी यांच्या संयुक्त सहकार्याने एकूण ११० रक्ताच्या पिशव्यांचे संकलन करण्यात आले. सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघ, सेक्टर ७ व ८ सानपाडा, पामबीच (सोनखार),ज्येष्ठ नागरिक सेवा समिती, सेक्टर १३, सानपाडा व ज्येष्ठ नागरीक संस्था जुईनगर, चिंचोली तलाव या तीनही ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र चालवणार्या संस्थांना प्रत्येकी दहा हजार रूपयांची आर्थिक मदत करण्यात आली व शासनाच्या एकूण ५० ज्येष्ठ नागरिक कार्डाचे देखील वितरण विविध सवलतीसाठी जेश्ठ नागरिकांना करण्यात आले.
सानपाडा पामबीच (सोनखार) येथील प्रभाग क्र. ७७, ७८ च्या मोराज रेसिडेन्सी गेट समोरील चैकात नागरिकांच्या सुरक्षा व संरक्षणाच्या दृष्टीने पोलीस प्रशासनास सहकार्य व्हावे म्हणून स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले व या सीसीटीव्ही कॅमेर्याचेे लोकार्पण सायंकाळी ६ वाजता मोराज चौैकात करण्यात आले.
त्याचप्रमाणे रयत षिक्षण संस्थेच्या पालघर जिल्हयातील आदिवासी आश्रम षाळांतील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्याच्या उपस्थित करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबईतील दिघा येथील झोपडपट्टी परिसरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी कार्य करणार्या शैक्षणिक संस्थेस शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सायंकाळी निशांत भगत यांच्या वाशी गांव येथील निवासस्थानासमोर आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसपर अभिष्ठचिंतन सोहळयास निशांत भगत यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभाशिर्वाद देण्यासाठी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदिप नाईक, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार रविंद्र फाटक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वजीत पतंगराव कदम, माजी महापौर सागर नाईक, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश युवक कॉंग्रेसचे पदाधिकारी सत्यजित शिवाजीराव देशमुख, आदित्य पाटील, विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नरचे अध्यक्ष सत्यशील शेेरकर यांच्यासह सर्व पक्षीय नगरसेवक व नगरसेविका, विविध सामाजिक, शैक्षणिक, कामगार, कला, क्रीडा, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना व प्रभाग क्र. ६५-वाशी गांव, प्रभाग क्र. ७७-सानपाडा, प्रभाग क्र. ७८-सानपाडा जुईनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.