दिपक देशमुख
नवी मुंबई :- नेरूळ पश्चिमेला आई वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने ४ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा आणि ५ एप्रिलला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
नेरूळ पश्चिमेला सेक्टर १० येथील साई बाबा हॉटेलशेजारील परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ एप्रिल रोजी सांयकाळी ६ ते १० या वेळेत स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ५ एप्रिलला सांयकाळी ४ वाजता पादुका पुजन, अभिषेक व आरती, सांयकाळी ७ ते १० भजन आणि त्यानंतर सांयकाळी ७.३० पासून भाविकांकरिता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होवून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आई वत्सला प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी केले आहे.