दिपक देशमुख
नवी मुंबई : मनपा कडून अमृत योजने अंतर्गत घणसोली येथील नाल्या लगत रोपटी लावली खरी परंतु त्यांची व्यवस्थित निगा राखली जात नसल्याने रोपटी कोमजू लागली आहेत.तसेच ही रोपटी लावताना निघालेले डेब्रिज तश्याचा तसाच पडला असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त आहे.त्यामुळे डेब्रिज कधी उचलला जाईल असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान ,याच मुद्द्यावर स्वतः आयुक्त एन.रामास्वामी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते.तरी पालिका अधिकाऱ्यांच्यात काहीही बदल झाले नसल्याचे दिसून येत आहे.
घणसोली येथील सेक्टर 9 व 7 दरम्यानच्या नाल्या लगत असणाऱ्या मोकळ्या जागेचे सुशोभीकरण केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत दीड कोटी खर्च करून करण्यात येत आहे.या मध्ये रोपे लावण्यासाठी निधीही प्राप्त झाले आहे.
सध्या या ठिकाणी अनेक प्रकाराची रोपटी लावली जात आहेत.परंतु त्या रोपट्यांची अपेक्षित अशी निगा राखली जात नसल्याने रोपटी कोमजली जात आहेत.सध्या उन्हाळ्याचा हांगाम चालू आहे.यावेळी रोपट्यांना जास्तीतजास्त प्रमाणात पाणी देणे गरजेचे आहे.परंतु येथे पाणी मुबलक असतानाही पाणी जास्त दिले जात नाही.वृक्ष कोमजू नये म्हणून ठिबक सिंचन पद्धत आवलंबने गरजेचे आहे.परंतु असा प्रकार केला जात नसल्याने रोपटे कोमजली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते निखिल म्हात्रे यांनी सांगितले.
नाल्यालागत असणाऱ्या जागेची साफसफाई करत असताना निघालेले डेब्रिज दोन महिने उलटून गेले तरी जसाच्या तास पडला असल्याने संबंधीत ठेकेदार करतो तरी काय ?व त्या ठेकेदारावर मनपा अधिकाऱ्यांचा अंकुश आहे की नाही ?असाही सवाल निखिल म्हात्रे यांनी विचारला आहे.जर हा डेब्रिज योग्यवेळी उचलला गेला नाहीतर डेब्रिज नाल्यात जाऊन नाला खराब होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.त्यामुळे सफाई करताना निघालेले डेब्रिज तात्काळ उचलावे अशी मागणी आरपीआय खोब्रागडे गटाचे नवी मुंबईतील पदाधिकारी शाम मेहता पाटील यांनी केली आहे.
अमृत योजणे अंतर्गत व्यवस्थित काम चालू नाही म्हणून मनसेने पत्रव्यवहार केला होता.त्यावेळी मनसेच्या पत्राची दखल घेऊन स्वतः आयुक्त एन रामस्वामी यांनी भेट देऊन पाहणी केली होती.त्यावेळी आयुक्तांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते.तरीसुद्धा त्यांच्यात बदल न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत उद्धान अधिकारी श्रीकांत जाधव यांना विचारले असता,रोपट्यांची योग्य ती दखल घेऊन डेब्रिज उचलण्यास ठेकेदाराला तात्काळ सांगतो असे सांगितले.