दीपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे या विरोधात महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या निर्देशानुसार सर्वच विभाग कार्यालय क्षेत्रात धडक कारवाई करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने ऐरोली विभाग कार्यालय क्षेत्रामधील शिव कॉलनी येथे दोन रो हाऊसचे अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या व्यंकटराव खंडागळे व रोशन सिंग, यांचे से. 01,रो हाऊस क्र. 1887 या अनधिकृत बांधकामास एमआरटीपी कायदा 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. तरी देखील संबंधिताने बांधकाम चालूच ठेवले होते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त डॉ. अमरिश पटनिगिरे यांच्या नियंत्रणाखाली, ऐरोली विभागाचे विभाग अधिकारी श्री. तुषार बाबर यांनी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह त्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली. तसेच एस एस टाईप, जे-15, से.03 येथील नोटीस बजावलेल्या अनधिकृत वाढीव बांधकामासही काढून टाकण्यात आलेल्या या कारवाईत 2 गॅस कटर, 1 ब्रेकर व 15 मजूरसह अतिक्रमण विभागाचे पोलीस पथक तैनात होते.