** राहुल शिंदे ह्यांच्या मागणीला यश
दीपक देशमुख
नवी मुंबई :- १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जाणार आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर १५ येथे डॉ.बाबासाहेब आबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे उदघाटन गेल्या काही महिन्यांपूर्वी झाले होते. बेलापूर येथील महापालिकेच्या मुख्यालयावर ज्या प्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते त्याधर्तीवर १४ एप्रिल रोजी देखील ऐरोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे ऐरोली विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांनी महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन.यांच्याकडे केली होती,त्यांच्या ह्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी एन.ह्यांनी बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यास मान्यता दिली असून त्याची निविधा ही काढण्यात आली आहे.
महापौर आणि आयुक्त ह्यांनी घेतलेल्या ह्या निर्णयामुळे आंबेडकर अनुयायी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्युत रोषणाईची मागणी करणारे राहुल शिंदे ह्यांनी महापौर जयवंत सुतार आणि आयुक्त रामास्वामी ह्यांचे आभार मानले आहेत.