दीपक देशमुख
नवी मुंबई :मनपाच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रूग्णालयातील ईसीजी विभागात महिला तंत्रज्ञ नसल्यामुळे महिला रुग्णवर्गात नाराजी पसरली आहे.याठिकाणी महिला तंत्रज्ञाची नेमणूक लवकरात लवकर करावी अशी मागणी महिला करत आहेत.
दरम्यान ,याठिकाणी उपलब्ध असणारे इसीजी तंत्रज्ञ पुरुष असल्यामुळे काही महिला ईसीजी रिपोर्ट काढून घेत नसल्याचे वास्तव आहे.
1996 पासून वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयाची सुरुवात झाली .तेव्हापासून दोनच ईसीजी पुरुष तंत्रज्ञ कार्यरत आहेत.आजची मनपाच्या हद्दीत 2011च्या जनगणने नुसार 17 लाख लोकसंख्या वास्तव्य करत आहेत. तसेच मनपाच्या हद्दीच्या बाहेरूनही येथे मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात.यातल्यात्यात सध्या महिलांनाही हृदयाच्या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे महिला तंत्रज्ञाची गरज भासू लागली आहे.
वाशी रुग्णालयात कार्यावर असणारे तंत्रज्ञ आपली वैद्यकीय सेवा प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.परंतु काही महिला रुग्ण यावर वाईट विचार करून ईसीजी काढण्यास धजावत नसल्याने महिला तंत्रज्ञाची भरती लवकरात लवकर करावी अशी मागणी नीता शिंदे यामहिलेने केली आहे. हेच मत आरोग्य विभागातील कर्मचारीवर्गानी देखील केली आहे.
याबाबत वैद्यकीय अधिकारी दयानंद कटके यांनी सांगितले की,याबाबत योग्य तो विचार करून ईसीजी महिला तंत्रज्ञ भरला जाईल असे सांगितले.