* वृक्षप्रेमी आमदार संदीप नाईकांच्या मतदारसंघातील घटना
* या प्रकरणाची आमदार संदीप नाईक चौकशी करणार काय
* डेब्रिज टाकणार्यांवर कारवाई करण्याची वृक्षप्रेमीची मागणी
दीपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने परिसरातील रस्त्याच्या दुभाजकावर वृक्ष लावली खरी परंतु रस्त्याचे काम करताना दुभाजकात डेब्रिज टाकल्याने त्या वृक्षाची वाढ खुंटल्याचे वास्तव समोर आले आहे.त्यामुळे कितीही मनपाच्या वतीने त्या रोपट्याना पाणी घातले तरी वाढ होताना दिसत नसल्याने वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
वृक्ष जगविणे ही काळाची गरज आहे.जर वृक्ष जगली तर नैसर्गिक संतुलन राहते.याचा फायदाही सजीवांना मोठ्या प्रमाणात होतो.त्यामुले शासनाच्या अनेक योजना द्वारे विविध ठिकाणी वृक्ष लागवड केली जाते.परंतु मनपाच्या दुभाजकात डेब्रिज टाकले गेले असल्याने वृक्षांची अवस्था जैसे थे असल्याचे वनराई संस्थेचे सदस्य रवींद्र औटी यांनी सांगितले.
नवी मुंबई परिसरातील बहुतांशी नवीन रस्त्याचे काम करणे,महामार्ग तयार करणे रस्त्याचे विकास करताना मनपाच्या ठेकेदारांनी चलाखी करून व वाहतुकीचे खर्च वाचवून रास्ता निर्मिती व विकास करताना निघालेला सिमेंट,दगड,डाबर याच दुभाजकात टाकला आहे.दुभाजकात जर लालमाती व काळी माती जर टाकली असती तर वृक्षांची वाढ चांगली झाली असती.परंतु या दुभाजकात खाडी,दगड व सिमेंटचे दगडच आसल्यामुळे नवीन रोपट्यांची वाढ होईल का असा प्रश्न पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी विचारला आहे.त्यामुळे या रोपट्यांना कितीही पाणी घातले तरी त्यांची अवस्था बल्यावस्थेतच राहील असेही दीपक काळे यांनी सांगितले.
कोणत्याही रस्त्याचे काम चालू असताना त्यावर देखरेख करण्यासाठी कनिष्ठ अभियंता,उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांची नियुक्ती केलेली असते.परंतु एव्हढी मोठी फळी असताना ठेकेदार आपले थोडेसे पैसे वाचविण्यासाठी एव्हढी हिम्मत करतोच कशी ?असा सवाल नागरिक विचारत आहेत.त्याच बरोबर हे जर अभियंता विभागाच्या लक्षात येत नसेल आश्या अभियंत्यांना कात्रजचा घाट दाखविणे गरजेचे असल्याचे पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष दीपक काळे यांनी सांगितले.हे अधिकारी फक्त कागद रंगविण्यात मग्न असतात की काय ?असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
याबाबत शहर अभियंता मनोहर डगावकर यांना विचारले असता चौकशी करून कार्यवाही करतो असे सांगितले.