दीपक देशमुख
नवी मुंबई – बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची काल नुकतीच सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. बैठकीत सदर विषयांवर चर्चा करण्यात आली असून नवी मुंबईतील सिडको अखत्यारीत लीज होल्ड वाढविण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात एक बैठक होऊन यावेळी घरांचे हस्तांतरण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन केल्यास प्रशासणाचा कारभार स्वच्छ व पारदर्शकता राहून संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर होऊ शकेल व नागरिकांना दलालांचा विळखा न पडता सर्व प्रक्रिया सुलभ होईल असे मत व्यक्त करून सिडकोने लीजहोल्डवर केलेल्या घरांची हस्तांतरण प्रक्रिया ऑनलाईन करावी अशी मागणी बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री. भूषण गगराणी यांसकडे केली आहे.