निलेश मोरे
मुंबई :- मुंबई शहर नेहमीच दहशवाद्यांच्या टार्गेटवर राहिले असून मुंबई पोलीस स्वतःची झोप उडवून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस रात्र जागता पहारा देत आहेत . दहशतवाद्यांचं मूळ जर मुळासकट उच्चाटून टाकायचं असेल तर देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने कायम जागृत राहणे आवश्यक आहे . मुंबईतील रेल्वे स्थानक , बस स्थानक , रुग्णालय , मंदिरे , सिनेमागृह आदी ठिकाणे गर्दीचे असल्याने या गर्दीचा काही समाजकंटक , अतिरेकी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात . मग अशा गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहिले तर अशा वाईट घटना घडणार नाही . ही संकल्पना लक्षात घेत एच जे दोशी हिंदूसभा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ वैभव देवगिरकर यांच्या संकल्पनेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुलविंदर कौर पुरेवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदूसभा रुग्णालयातील सर्व कर्मचारी वर्ग , परिचारिका , डॉक्टर , सेक्युरिटी आदींसाठी एकदिवशीय जागृत मोहीम घेण्यात आली . अज्ञात वस्तू रुग्णालयात दिसली तर कर्मचारी वर्गाने गोंधळ न उडवता ती गोष्ट वरिष्ठा पर्यंत कशी पोहोचवायची अन त्यानंतर पोलिसांना याबाबत कशी माहिती द्यायची यावर कुलविंदर कौर यांनी मार्गदर्शन केले . यामोहिमेला डॉ रजनीकांत मिश्रा , डॉ श्रुती हळदणकर , डॉ रवींद्र कांबळे आदी उपस्थित होते .