दिपक देशमुख
नवी मुंबई :- भारत रत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीचे औचित्य साधून विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन घणसोली नोड ,घणसोली गाव ऐरोली येथे आयोजन करण्यात आले होते.या आरोग्य शिबिराला नागरिकांचेही तितकेच सहकार्य लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.
घणसोली नोड सेक्टर नऊ येथील न्यू सिटी स्कूल येथील सभागृहात आदर्श सेवा संस्थेच्या वतीनेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 400 नागरिकांनी रक्तदान केल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष उमेश जुनघरे यांनी दिली.यावेळी समाजसेवक सिद्धार्थ शंभरकर,नवी मुंबई भाजप उपजिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे,सचिव बिपीन तायडे भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य प्रवीण चारी,वॉर्ड अध्यक्ष रवींद्र राजीवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐरोली जुना चिंचपाडा येथील युवा क्रीडा मित्र मंडळाच्या वतीने नेत्र रोग शिबीर व रक्त तपासणी शिबरचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी परिसरातील 600 नागरिकांनी नेत्र तपासणी व रक्त तपासणी करून घेतली.ही तपासणी केअर पॉलिक्लिनिक संस्थेच्या डॉक्टरांनी केल्याची माहिती आयोजक व युवा क्रीडा मित्रा मंडळाचे अध्यक्ष अतुल आवारी पाटील यांनी दिली.
घणसोलीगावातील येथील साई सदानंद मित्रा मंडळाचे वतीनेही भीम जयंती साजरी करण्यात आली .यामध्ये विविध स्पर्धा तसेच सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच विणायला नास्ता व पाण्याची सोय करण्यात आली होती.अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक परशुराम उबाळे ,वैभव कांबळे व अजय पवार यांनी दिली.