दिपक देशमुख
नवी मुंबई :- नवी मुंबई परिसरातील नव्याने बांधण्यात आलेले पुल सुरू झाल्या नंतर बेलापूर ते दिघा अंतर वीस ते पंचवीस मिनिटात पार केले जाईल ही अटकळ केली जात असतानाच या अटकळला रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्या समोर अटकाव होणार असल्याचे वास्तव आहे.याठिकाणी असणारा रस्ता तुलनेने छोटा असल्यामुळे अटकळ घालणाऱ्यांचा स्वप्न भंग होणार आहे. यामुळें येथें वाहतुकीचा प्रश्न भविष्यात मोठा होणार आहे.
मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणच्या वतीने 155 कोटी खर्च करून पावणे,घणसोली नाका व महापे येथे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला होता म्हणून 2015 मध्ये ठाणे बेलापूर महामार्गावर पूल निर्मितीस सुरूवात केली गेली.हे तीनही पूल सध्या पूर्णत्वाच्या दिशेने आगेकूच करत आहेत.
हे तीनही पूल बांधल्यानंतर वाहतुकीचा प्रश्न सुटणार असे भाकीत केले जात असले तरी रबाले एमआयडीसी पोलीस ठाणे समोर एक चिंचोळा रस्ता ऐरोली,मुलुंड कडे जातो तर दोन पदरी रस्ता ठानेच्या दिशेने जातो.याठिकाणी आजही सकाळी व संध्याकाळी भयानक वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.जर भविष्यात मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणने निर्मिती केलेली पूल सुरू झाली तर बेलापूर वरून येणारी वाहने जलदगतीने एरोलीच्या दिशेने येतील व रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्या समोर धडकतील. त्यामुळे येथे वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन त्या वाहतुकीतून सुटका करणे चालकांना त्रासदायक होण्याची शक्यता असल्याची चालक प्रदीप शिंदे यांनी सांगितले.
ठाणे बेलापूर महामार्गावरील वाहतुकीच्या प्रश्नाचा निपटारा करायचा असेल तर उत्तम उपाय म्हणजे रबाले नाका येथे अजून एक उड्डाणपूल पूल निर्माण करायची गरज आहे.हा उड्डाणपूल रबाले एमआयडीसी पोलीस ठाण्या समोर आसलेल्या व ठानेच्या दिशेने जाणाऱ्या पुलाला जोडणे गरजेचे आहे.त्याच बरोबर ऐरोली ,मुलुंड कडे जाणाऱ्या जाणारा जो सध्याची मार्गिका आहे तीच ठेवली तर वाहतुकीचा प्रश्न मिटेल.परंतु हे अधिकाऱ्यांच्या लक्षात न येणे हे दुर्दैव असल्याचे चालक प्रदीप शिंदे यांनी सांगितले.त्यामुले आता जे वाहतूकही संबंधी स्वप्न पाहिलें जात आहे ते स्वप्नांचं असल्याचे अनेक वाहन चालकाचे म्हणणे आहे.
याबाबत मनपाचे शहर अभियंता मोहन डगावकर यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता होऊ शकला नाही.