दीपक देशमुख
नवी मुंबई : मनपाच्या परिवहन विभाग घणसोली आगारातील बहुतांशी वाहन चालक बेधडक बस चालवत असल्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.या बस चालकांना वेळीच आवरा नाहीतर एखाद्या मोठ्या आपत्तीला सामोरे जावे लागेल अशी भीती प्रवाशी व्यक्त करत आहेत.
घणसोली बस आगार मे 2016 मध्ये लोकार्पण झाला.सध्या या आजारात एकूण 114 बस आहेत.ह्या आगारात कार्यरत असणारे सर्व चालक श्रीमहालक्ष्मी ट्रान्सपोर्ट ठेकेदाराचे आहेत.परंतु हे चालक वाहन चालवताना बेदरकारपणे चालवत असल्यामुळे प्रवाश्यांच्या पोटात गोळा येत आहे.अशी भीती अनेक प्रवाश्यांनी बोलून दाखविली.
घणसोली आगारातील बहुतांशी चालक हे कंत्राटी पद्धतीने इथे कार्यावर आले तरी ते यापूर्वी ट्रक,टेम्पो व ढम्पर आदी वाहने चालवत होते.त्यामुले अजूनही ते आपल्या पूर्वीच्या वाहनांवरच आहोत हे विसरले नसल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले.वाहन चालकाच्या वाहन वाईट चालविण्यामुळे अनेक बसची अवस्था गंभीर झाली असल्याचे परिवहन सूत्रांनी सांगितले.
हे चालक मोकळा रस्ता दिसला की भरधाव बस पळवणे,गतिरोधक आला तरी वाहन हळू न चालविणे,खड्ड्यात बस आपटने,काही चालक तर नागरीवस्तीत,बाजारपेठेतही वाहने जोरात पळवत असल्याने व उड्डाणपुलावर वेग कमी करत नसल्याने आजतागायत छोटेमोठे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी आजारातून निघालेलया बस चालकांनी विरोधी बाजूस भरधाव जाऊन एक रिक्षा चालकाचा जीव घेतला होता.त्यामुळे भविष्यात एखादी अपघाताची घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल भाजप वॉर्ड अध्यक्ष रवींद्र राजीवडे यांनी विचारला आहे.
याबाबत परिवहन सभापती प्रदीप गवस यांना विचारले असता,घणसोली आगारातील वाहन चालक भरधाव वाहन चालवत असतील तर वाहने योग्य प्रकारे चालविण्याच्या सूचना देतो.