दीपक देशमुख
नवी मुंबई :पावसाळ्या पूर्वी शासन,मनपा तसेच विविध सामाजिक संस्था व मंडळाच्या वतीने मोकळ्या जागेवर रोपटी लावतात.परंतु घणसोली येथील एका कुटुंबांनी भर उन्हाळ्यात तीस रोपट्यांची लागवड करून त्यांना जगविण्याचे आवाहन घेतले आहे.विशेष म्हणजे त्या कुटुंबाच्या घरातील १२ सदस्य दिवसातून तीन वेळा रोपट्यांना पाणी घालून त्यांना संरक्षण देणार आहेत.
घणसोली सेक्टर सहा मध्ये मोहन जाधव हे आपल्या कुटुंबा बरोबर राहतात.त्यांची सहज सेवा सामाजिक प्रतिष्ठान नावाची संस्थाही आहे.यासंस्थेच्या माध्यमाने त्यांनी आजतागायत विविध सामाजिक कार्यही केली आहेत.त्यामध्ये स्वच्छता अभियान,शाहिद जवान साठी श्रधानजली ,आदिवासी मुलांना खाऊ व कपडे वाटप आदी अनेक कार्यक्रम त्यांनी नियमित पार पडले आहेत.
स्वामी समर्थ पुण्यतिथी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर व आपला जिवलग मित्र राहुल कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सद्गुरू रुग्णालयाच्या पाठीमागील मोकळ्या भूखंडाच्या किनार्यावर अशोक,आंबा,वड, उंबर,जांभूळ व बदाम असे एकूण तीस रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे.महत्वाचे म्हणजे मोहन जाधव यांच्या बरोबरच त्यांचे वडील कीर्तनकार रामचंद्र,आई सुभद्रा,बहीण भरती,वहिनी प्रभावती,भाऊ प्रदीप,मुलगा,मुलगी,पुतण्या ,पुतणी,भाचा व भाची असे एकूण बारा सदस्यांनी यारोपट्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.यासाठी त्यांना सहकार्य मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष बन्सी डोके व नवी मुंबई अध्यक्ष संताजी पाटील यांनी केले आहे
मोहन जाधव यांचे वडील रामचंद्र जाधव हे सुप्रसिद्ध कीर्तनकार व प्रवचनकार आहेत. त्यामुळे मोहन यांना समाजसेवेचे बाळकडू जन्मताच मिळाले.याचे भान ठेवून वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचारी या स्थवणाचे भान ठेवून सजीवांना निसर्गाची खूप मोठी गरज असल्याचे भान ठेवून वृक्ष लागवड करत असल्याचे शेवटी मोहन जाधव यांनी सांगितले.