नवी मुंबई : आपल्यात जिद्द असणे महत्वाचे आहे.जिद्द असेल तर आपण काहीही करू शकतो.त्यावेळी येणार्या छोट्या मोठ्या आडचणीं साठी आम्हाला कधीही संपर्क साधा,आम्ही तुमच्या बरोबर आहोत.आम्ही फक्त हार तुरे घेण्यास आलो नाहीत तर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यास आलो आहोत असा प्रेमळ सल्ला शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी वाशी येथील रिक्षा चालकांच्या मेळाव्यात दिला.
धर्मवीर रिक्षा चालक सेना नवी मुंबईच्या वतीने वाशी, सेक्टर ९ येथील गुरव ज्ञाती सभागृहात रिक्षा चालक मेळावा,गुणी रिक्षाचालकांचा सत्कार व मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपनेते नाहटा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बेलापूर संपर्क प्रमुख विठ्ठल मोरे, शहर प्रमुख विजय माने,नगरसेवक रामदास पवळे,भाजपचे बाळकृष्ण चव्हाण,शिवसेना लीगल सेलचे प्रमुख ज्ञानेश्वर कवळे, धर्मवीर रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष व आयोजक संतोष गाडे, पदाधिकारी कुसुमताई नागरगोजे, शाखा प्रमुख सोमनाथ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते. रिक्षा चालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना उपनेते नाहटा पुढेही म्हणाले की, व्यसना पासून दूर रहा ,व्यसनाने आपल्या कुटुंबाची राखरांगोळी होईल त्यासाठी व्यसन सोडा.तसेच मुलांना शिक्षण द्या, वेळआली तर आपल्या गरजा कमी करा पण मूळ व मुलींना शिक्षण द्या असेही मार्गदर्शन रिक्षा चालकांना केले.
धर्मवीर रिक्षा चालक सेनेचे अध्यक्ष संतोष गाडे यांनी आपल्या प्रस्तावनेत रिक्षा चालकांना भेडसावणार्या विविध प्रश्नांची माहिती दिली.तसेच दिघा ते बेलापूर परिसरातील रिक्षा चालकांना येणारे प्रश्न सोडविणार असे सांगितले. याच मेळाव्यात ज्या रिक्षा चालकांनी प्रामाणिक काम करून जनतेला मदत केली आहे अश्या रिक्षा चालकांचा सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर रिक्षा चालकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कारही करण्यात आला.तसेच रिक्षा चालकांच्या मुलांना २००० वह्या मोफत वाटण्यात आल्या.