* मनसे महिला सेना आक्रमक * गॅसची तिर्डी बांधून व चूल पेटवून महागाईचा निषेध
नवी मुंबई :- सत्ताधारी मोदी सरकारने केलेल्या गॅस व इंधन दरवाढीचा तसेच महागाईचा आज मनसे नवी मुंबईच्या महिला सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र निषेध करण्यात आला. वाशी रेल्वेस्थानकासमोर मनसेच्या महिला सेनेने गॅसची तिर्डी बांधून व चूल पेटवून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला. चुलीवर दोन भाकरी थापून त्या नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी बनविल्या असल्याचे महिला सेनेने म्हटले आहे. याप्रसंगी “महागाई वाढली बेसुमार,आता नको मोदी सरकार”, “रुपयाने वाढवणार पैश्यानी कमी करणार असा भाजपा सरकारचा अजब कारभार”, “दररोज वाढतोय महागाईचा भस्मासुर प्रधानसेवक करतात सारखे टूर”, “मोदी सरकार हाय-हाय हाय-हाय” अशा घोषणा देऊन मनसे महिला सेनेने वाशी रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला.
यावेळी मनसेने गॅस सिलेंडरची प्रतिकृती बनवून ती तिरडीवर ठेऊन वाशी रेल्वे स्थानक परिसरात फेरी देखील मारली. यावेळी मोठ्या संख्येने सामान्य नागरिक देखील मनसेच्या या आंदोलनात सहभागी झाले व मोदी सरकार विरोधात आपला रोष व्यक्त केला. आधीच महागाईने सर्वसामान्यांच कंबरड मोडलं असताना मोदी सरकार मात्र दररोज इंधनाचे व गॅसचे दर सर्ररासपणे वाढवत असल्याचे मनसे महिला सेनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. तसेच जागतिक बाजारात इंधनाचा दर नियंत्रणात असताना भारतात फक्त मोदी सरकार इंधन दरवाढ का करत आहे असा सवाल यावेळी मनसे महिला सेनेने थेट सरकारला विचारला आहे. येत्या दिवसात ही महागाई अशीच वाढत राहिली तर मोदी सरकार विरोधातील हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा देखील इशारा मनसे महिला सेनेतर्फे देण्यात आला आहे.
याप्रसंगी महिला सेनेच्या उपशहर अध्यक्ष डॉ.आरती धुमाळ, अनिथा नायडू, शुभांगी बंदीछोडे, शहर सचिव गायत्री शिंदे, मृणाल महाडिक तसेच महिला सेनेच्या सोनल भूतकी, कल्पना आयरे, संगीता पवार, शीतल मोरे, सुशीला पेनिन्गुदन, वैशाली खतिंग, दीपाली दमाने, दीपाली धूल, सिद्धी हर्यान, संगीता वंजारे, कमल पाटील, पंचशीला तूपतनुद्रे, किमया दळवी, सुलोचना डोंगरे, अनिता गोटे, अनिता घाणेकर, अश्विनी महाडिक, लक्ष्मी महाडिक, कल्पना घोसाळकर, सुरेखा आव्हाड, सौ.बुआशेट्टी, सौ.म्हात्रे, सोनीया धनके, रेखा पवार व मोठ्या संख्येने मनसैनिक उपस्थित होते.