अमोल इंगळे
नवी मुंबई : महापालिकेच्या नेरूळ नोडमध्ये प्रभाग ८५ मधील सारसोळे गाव, कुकशेत गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात धुरफवारणी व अळीनाशक मोहीम स्थानिक कार्यसम्राट नगरसेविका सौ. सुजाता पाटीलमॅडम यांच्या प्रयत्नातून आणि पालिका प्रशासनाच्या माध्यमातून राबविण्यात आली.
पावसाळ्यात साथीचे आजार वाढीस लागतात. त्यात गृहनिर्माण सोसायटयामध्ये मलेरिया व डेंग्यूचे रूग्ण आढळत असल्याचे पाहून स्थानिक नगरसेविका सौ. सुजाता पाटीलमॅडम यांनी प्रभाग ८५ मध्ये आरोग्य खात्याकडून विशेष अभियान राबविण्यासाठी पाठपुरावा केला. कुकशेत गाव, सारसोळे गाव, नेरूळ सेक्टर सहा परिसरात पालिका प्रशासनाकडून धुरीकरण व अळीनाशक कार्यक्रम राबविण्यात आला.
**
नगरसेविका सुजाता पाटीलमॅडम यांचे आभार
आजचा काळ हा मार्केटींगचा व केलेली कामे सर्वाना दाखविण्याचा झालेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रभागात कामे करवून घेताना, फोटो न काढणार्या सुजाता पाटीलमॅडम यांची ही शैली लोकांच्या मनात घर करून जाते. धुरीकरण होते की नाही, गटारे-नाल्यात अळीनाशके टाकली जातात की नाही, सोसायट्या सर्व करतात की कामे अर्धवट सोडतात याचा पाठपुरावा स्वत: नगरसेविका सौ. सुजाता पाटील मॅडम घेत होत्या. काम करवून घेणे व कोठेही फोटोत न दिसणे याचा खरोखरीच महापालिकेतील सर्व नगरसेवकांनी आदर्श घेवून अनुकरण करणे आवश्यक आहे.
:- संदीप खांडगेपाटील
पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता