नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेनेचा राज्यभरातील महापालिकेतील कर्मचार्यांचा महामेळावा नवी मुंबई येथे रविवार दि.०५ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ०२ वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न होणार आहे. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मनसे अध्यक्ष सन्मा.राजसाहेब ठाकरे उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात माहिती देण्याकरिता मनसे तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन बेलापुर येथे करण्यात आले होते.
यासंदर्भात उपस्थित पत्रकारांना माहिती देताना मनसे कर्मचारी सेना अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी सध्याच्या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकेतील कर्मचार्यांचा महत्वाचा मुद्दा मनपातील सर्व कामांचे कंत्राटीकरण करणे हे धोरण असल्यामुळे आजचा कामगार देशोधडीला लागलेला आहे. मनसे कामगारांचे कंत्राटीकरण थांबवून महानगरपालिकेच्या मुख्य प्रवाहात घेऊन कायमस्वरूपी नियुक्तीसाठी राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. पत्रकारांच्या प्रश्नास उत्तर देताना कार्याध्यक्ष संतोष धुरी यांनी राज्यभरातील सर्व महापालिकेतील कामगार व कर्मचारी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याखाली एकत्रित आणण्याचे काम सुरू असल्याचे संगितले.
नवी मुंबई महानगरपालिकेतील कामगार कर्मचार्यांच्या संघटनेबाबत माहिती देताना उपाध्यक्ष गजानन काळे यांनी आत्तापर्यंत सुमारे दोन हजार सदस्य नोंदणी झाली असून, आठ महानगरपालिकांमध्ये सुमारे २० हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेत कामगारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या जसे की पगारपावती, ESIC कार्ड, पीएफ क्रमांक, कामगार वेतांनातील फरक, मूलभूत सोयीसुविधा मनसेच्या पाठपुराव्यामुळे मिळाल्या आहेत. तसेच नवी मुंबई मनपातील कामगारांचा १३ महिन्यांचा किमान वेतनाचा फरक सुमारे ७० कोटी रुपये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात घेण्यासाठी मनसेने पाठपुरावा केला व प्रशासनाकडून त्याची मंजूरी करून घेतली. त्यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला. महाराष्ट्रभरातील कामगारांचा महामेळावा नवी मुंबईत घेण्याची संधी दिल्याबद्दल सन्मा.राजसाहेबांचे गजानन काळे यांनी आभार मानले.
सदर प्रसंगी संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे, शशांक नागवेकर, पृथ्वी येरूनकर, अतुल भगत, एड.अक्षय काशीद, अप्पासाहेब कोठूळे, राजेश उज्जैनकर, अमोल आयवळे, अभिजीत देसाई, रूपेश कदम, यातीन देशमुख, प्रसाद परब, संदीप गलुगडे, गोविंद सुप्पया, सविनय म्हात्रे, नितिन खानविलकर, जयंत सकपाळ, मिलिंद खाडे, आरती धुमाळ, अनीता नायडू, श्रीकांत माने, नीतिन चव्हाण, विलास घोणे, अभिलेश दंडवते, सनप्रीत तुरमेकर, उपस्थित होते.