दिपक देशमुख
नवी मुंबई : नवी मुंबईचे विकासपर्व म्हणून नवी मुंबईचे ओबामा या नावाने उभ्या महाराष्ट्रात ओळखल्या जाणार्या आमदार संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमित्त बेलापुर विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने शुक्रवार, दि. ३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष देवनाथ म्हात्रे यांनी दिली.
नेरूळ गावातील बांचोली मैदानावर शुक्रवारी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच ठिकाणी सकाळी १० ते सांयकाळी ५ वाजेपर्यत ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत ओळखपत्र नोंदणी शिबिराचे देवनाथ म्हात्रे यांनी आयोजन केले आहे. रक्तदान शिबिरात नेरूळवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून सामाजिक बांधिलकीचे आपले कर्तव्य जोपासावे असे आवाहन देवनाथ म्हात्रे यांनी केले आहे.