सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
राष्ट्रवादीचे नेरुळ प्रभाग ९५ चे नगरसेवक गिरीश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ९३ चे वॉर्ड अध्यक्ष अक्षय पाटील यांनी केले होते या कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई : संपूर्ण राज्यात आपल्या विकासकामांच्या जोरावर नवी मुंबईचे ओबामा म्हणून परिचित असलेले ऐरोली मतदारसंघाचे आमदार संदीप नाईक ह्यांनी आपला ४ ऑगस्ट रोजी असणारा वाढदिवस कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी हार तुरे वर खर्च न करता समाज उपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करा असे आव्हान आपल्या असंख्य युवा कार्यकर्त्यांना केले होते. त्याच आव्हानाला प्रतिसाद देत सालाबादप्रमाणे नेरुळ वॉर्ड क्रमांक ९३ चे वॉर्ड अध्यक्ष अक्षय गजानन पाटील यांनी नगरसेवक गिरीश म्हात्रेंच्या दुचाकी चारचाकी व रिक्षा वाहनांना मोफत पी.यु.सि शिबिर कार्यक्रम आयोजित केला होता. या उपक्रमाचा नेरुळ व आसपासच्या शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.
सदर शिबिराचे उदघाटन ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक ह्यांचा हस्ते करण्यात आले तर महापौर जयवंत सुतार, माजी महापौर सागर नाईक पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रतोद डॉ.जयाजी नाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. आमदार संदीप नाईक हे पर्यावरण प्रेमी आहेतपर्यावरण निगडीत कार्यक्रम म्हणून दररोज वाढणारी वाहनांची संख्या त्यातून निर्माण होणारे प्रदूषण हे लक्षात घेवून प्रदूषण नियंत्रणात राहिले पाहिजे. नवीन कायद्यानुसार वाहनांचा अपघात झाल्यास इन्शुरन्स मिळवण्यासाठी पी.यु.सि बंधनकारक असल्याने या कायद्याची सुद्धा जनजागृती व्हावी म्हणून हे शिबीर आयोजित केले असल्याचे आयोजक व वॉर्ड अध्यक्ष अक्षय पाटील ह्यांनी सांगितले.
सदर शिबीरात वॉर्ड क्रमांक ९५ चे वॉर्ड अध्यक्ष गणपतबुवा भोपी, गावदेवी माता ट्रस्टचे अध्यक्ष दामोदर म्हात्रे, नारायण पाटील, रत्नाकर पाटील, अनंत म्हात्रे गुरुजी, विजय पाटील,भालचंद्र म्हात्रे, रमेश पाटील, मिलिंद पाटिल तसेच युवा सहकारी देवनाथ म्हात्रे, हरेश भोईर, जयंत म्हात्रे, संदेश गायकवाड प्रितेश पाटिल उपस्थित होते.