नवी मुंबई : मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘देवा’ ग्रुपकडून पाणी व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. मराठा आरक्षणावरून आंदोलनाचा मागील अनुभव लक्षात घेता पोलिसांनी आज नवी मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. नेरूळ नोडमध्ये सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘देवा’ ग्रुपकडून वाशी ते बेलापुरदरम्यान सर्वच ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना पाण्याची बाटली व अल्पोहाराचे वाटप करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पाण्याचे व अल्पोहाराचे वाटप करत ‘देवा’ ग्रुपने सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवा ग्रुपचे देवनाथ म्हात्रे, गणेश पालवे, दिनेश गवळी, मनीष यादव, चेतन खैरनार, चैैतन्य कांबळे, अजित धोंडकर, मुकेश नाईक, यश अपंडकर, साजन तांडेल, मिलिंद भोईर, संतोष आंधळे, किरण घोडके, अनिरूध्द अंडागळे यांनी परिश्रम घेतले.