मुंबई – परळमधल्या 17 मजल्यांच्या क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास ही आगलागल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या आगीत चार जणांचा मृत्यू झाला असून, 25 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. क्रिस्टल टॉवरच्या 12व्या मजल्यावर लागलेली ही दुस-या श्रेणीची आग आता तिस-यावरून चौथ्या श्रेणीची झाली आहे. त्यामुळे इमारतीतील लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच अग्निशामक दलाचे जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला. या आगीच्या धुरात 8 जण गुदमरल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नसल्याचा स्थानिकांनी दावा केला आहे. 12व्या आणि 13व्या मजल्यावर आगीमुळे मोठं नुकसान झालं आहे. एकूण 17 मजल्याचा हा टॉवर असून, त्यातील दोन माजले हे पार्किंगसाठी आहेत. मृतांमध्ये एक वृद्ध महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली आहे.