सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दिनांक 01 ते 31 ऑगस्ट, 2018 या कालावधीत शहरामध्ये “घाण आणि अस्वच्छते पासुन स्वातंत्र्य” (Independence from filth and insanitation) या संकल्पनेच्या अधारे विद्यार्थी व युवक यांच्या सहभागाने विशेषस्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
त्याअनुषंगाने दिनांक 23/08/2018 रोजी कोपरखैरणे विभाग कार्यक्षेत्रातील राहुल नगर या झोपडपट्टी भागातील सर्व रहिवाश्यांना स्वच्छता निरिक्षक श्री. सुभाष म्हसे व शेल्टर असोसिएशनच्या श्रीम. धनश्री मॅडम यांनी ओला कचरा व सुका कचरावर्गीकरणाबाबत व कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच कचऱ्यावर प्रक्रिया करणेबाबत सर्वांना प्रात्यक्षिका दाखवून मोठयाप्रमाणातजनजागृती केली आहे. तसेच सर्व नागरिकांकडुन स्वच्छता ॲप डाऊनलोड करुन घेतले. या मोहिमेमध्ये नवी मुंबईमहानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी श्री. सुभाष म्हसे, स्वच्छता निरिक्षक श्रीम. कवीता खरात, उप स्वच्छता निरिक्षक श्री. विजयचौधरी, शेल्टर असोसिएशनचे कर्मचारी व स्वच्छाग्रही तसेच परिसरातील नागरीक मोठ्यासंख्येने सहभागी होत आहेत.