स्वयंम न्युज ब्युरो
नवी मुंबई : नवी मुंबई कार्यक्षेत्रात प्रसिध्द असणारा सारसोळे गावचा नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या उत्सवात बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक सहभागी झाले होते. त्यामुळे यंदाचा उत्सव ताई व दादांच्या सहभागामुळे उत्साहात साजरा झाल्याचे सारसोळेच्या ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
दरवर्षीपेक्षा यंदा सारसोळे गावच्या नारळी पौर्णिमेच्या पालखी सोहळ्यात गाववाल्यांच्यासोबत कॉलनीवालेही तितकेच उत्साहाने सहभागी झाल्यामुळे पालखी सोहळ्यात लांबवर अथांग पसरलेला जनसमुदाय पहावयास मिळत होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सारसोळे गावातील होळी मैदानालगतच्या कोलवाणी माता मंदिरापासून नारळी पौणिर्र्मेच्या पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. पालखी सोहळ्यास सुरूवात होण्यापूर्वीच बेलापुरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या सारसोळे गावातील कोलवाणी मातेच्या मंदिरापाशी आल्या. गावातील अवस्था पाहून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी चिंता व्यक्त केली.
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे जाताच लगेचच कोलवाणी मातेच्या मंदिराजवळ नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांचे आगमन झाले. त्यांनी दर्शन करून गेल्यावर पालखी सोहळयास सुरूवात झाली. सकाळी १० वाजता होळी मैदानापासून चाललेला पालखी सोहळा दुपारी दोन वाजता सारसोळेच्या जेटीवर पोहोचला. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाताताई सुरज पाटील, नगरसेविका सौ. जयश्री एकनाथ ठाकूर, शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, शहरप्रमुख विजय माने, उपशहरप्रमुख गणपत शेलार, नगरसेवक सोमनाथ वासकर, परिवहन समिती सदस्य विसाजी लोके, नगरसेवक काशिनाथ पवार, माजी नगरसेवक रतन मांडवे, नगरसेविका सौ. सुनिता मांडवे, युवा सेना बेलापुर उपविधानसभा अधिकारी निखिल मांडवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुकाध्यक्ष गणेश भगत, नगरसेविका रूपाली भगत, किसमत भगत, रवींद्र भगत, ब प्रभाग समिती सदस्य विजय साळे, बिपिन झवेरी, बेलापुर विधानसभा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे, हरेश भोईर, दिनेश गवळी, मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, विनय कांबळे, सचिन कदम, संदेश डोंगरे, भाजपाचे अमर पाटील, शिवसेनेचे शाखाप्रमुख शैलेश भोईर स्थानिक भागातील राष्ट्रवादीचे तुकाराम टाव्हरे, महादेव पवार, शिवसेनेचे उपविभागप्रमुख प्रल्हाद पाटील, समुद्राताई पाटील, मनोज तांडेल, दिलीप आमले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सारसोळेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यामध्ये पत्रकार निलेश पाटील, संजय गुरव, महादेव देशमुख, बाबाजी गोडसे, साईनाथ भोईर, गोपाल पासवान यांच्यासह विविध वर्तमानपत्राचे छायाचित्रकार व यू ट्यूब वाहिन्यांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पत्रकार साईनाथ भोईर खाडीमध्ये नारळ विसर्जित करण्यासाठीही सहभागी झाले होते.
यंदाच्या नारळी पौर्णिमेत आमदार मंदाताईंची उपस्थिती खर्या अर्थाने सारसोळेकरांना सुखावणारी होती. आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या नातसून असल्याने त्यांचे सारसोळे गावच्या मातीशी प्रारंभापासूनच नाते आहे. त्यांनी सोहळ्याच्या सुरूवातीला दाखविलेली उपस्थिती व सारसोळे जेटीवर बराच वेळ सारसोळेच्या महिलांसोबत केलेले नारळी पौर्णिमेचे पांरपारिक नृत्य या बाबी लक्षवेधी ठरल्या.
दिवाळे गाव, वाशी गाव, तळवली गाव,दिवा गाव, ऐरोली गाव, नेरुळ गाव आदी गावांमध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात सजरी करण्यात आली. यात सर्वात आकर्षणाची नारळी पौर्णिमा ठरली ती सारसाळे गावाची. नवी मुंबईतील प्रतिष्ठेची व सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर मानली जाणारी सारसोळे कोळीवाड्याची नारळी पौर्णिमा उत्साहात व पारंपारिक नृत्याच्या आविष्कारामध्ये पार पडली. दीड हजाराहून अधिक लोक सारसोळेच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.
सारसोळे कोळीवाड्यातून ग्रामस्थ, गावातील सर्व संस्था, ग्रामस्थांची मंडळे आणि कोलवाणी माता मित्र मंडळाच्या माध्यमातून साजरी करण्यात येणारी नारळी पौर्णिमा बहूचर्चित व आकर्षणाचा विषय बनली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सारसोळे कोळीवाड्यातील कोलवाणी मातेच्या मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात झाली. कोळी समाजातील पुरूष, महिला आणि मुले पारंपारिक वेशामध्ये या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.
सारसोळे कोळीवाडा ते पामबीच मार्गावर असणारी सारसोळेची जेटी यादरम्यान सुमारे चार तास निघालेल्या या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांची पारंपारिक वेशातील नृत्ये कमालीचे आकर्षण बनले होते. जेटीवर पालखी आल्यावर आरती घेवून या पालखी समाप्त करण्यात आली. त्यानंतर सारसोळे ग्रामस्थांच्या होड्या नारळ खाडीमध्ये सोडण्यासाठी रवाना झाल्या. खाडीमध्ये नारळ सोडण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश भगत, शिवसेना शाखाप्रमुख मनोज तांडेल, शैलेश भोईर, नगरसेवक सूरज पाटील स्वत: शेवटपर्यत उपस्थित होते. त्यांनी नारळ खाडीला समर्पित करून प्रार्थना केली. हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा करण्यासाठी आयोजक कोलवाणी माता मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सारसोळे ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला नेरूळ पोलिसांनीही कमालीचे सहकार्य केल्यामुळे हा पालखी सोहळा व नारळी पौर्णिमेचा सण उत्साहात पंरतु शिस्तबध्दरित्या पार पडला. सारसोळे गावातील पालखी सोहळा ज्यावेळी जेटीवर पोहोचला, त्याअगोदरच जेटीवर नवी मुंबईकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सारसोळेचा नारळी पौर्णिमेचा उत्सव उत्साहात व भक्तीभावाने साजरा झाल्याबद्दल आणि मोठ्या संख्येने नवी मुंबईकर यात सहभागी झाल्याबद्दल सारसोळेचे ग्रामस्थ, कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष व ब प्रभाग समितीचे सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी नवी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.