सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई : नेरूळ पश्चिमेला अल्पावधीत प्रभागातील समस्या सोडवून नावारूपाला आलेल्या कार्यसम्राट नगरसेविका रूपाली किसमत भगत यांनी आपल्या प्रभागातील उद्यानाला सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिका आयुक्तांसह महापौरांकडे केली आहे.
नेरुळ सेक्टर-१६ येथील छत्रपती संभाजी राजे उद्यानात सुरक्षारक्षक नसल्यामुळे उद्यानातील खेळण्याची मोडतोड करणे ,हिरवळ ,शोभेच्या झाडांचे नुकसान केले जात होते याबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार उद्यानांमधील मालमत्तेचे संरक्षण व्हावे व त्या ठिकाणी गैरप्रकार घडू नये यासाठी छत्रपती संभाजी राजे उद्यानात सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.एन.रामास्वामी, महापौर जयवंत सुतार,शहर अभियंता आणि उपायुक्त उद्यान विभाग यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली.
प्रभागातील सेक्टर-१६ सी-ब्रिज टॉवर बस थांबा ते ए-१ महालक्ष्मी सोसायटी पर्यंतचे कमकुवत झालेल्या गटाराला दत्तकृपा सोसायटी जवळ छिद्र पडले असून तेथे दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सदर ठिकाणावरील गटर लवकरात लवकर नव्याने बांधण्याचे मागणी करणारे पत्र नगरसेविका रुपाली किस्मत भगत यांनी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.एन.रामास्वामी, महापौर जयवंत सुतार,शहर अभियंता यांना दिले. यावेळी समाजसेवक रमेश नार्वेकर,रविंद्र भगत उपस्थित होते.