पनवेल: थिरकायला लावणारा संगीताचा ठेका, डोलायला लावणारी बहारदार गीतं, शास्त्रीय संगीताच्या सुरावटींवर फुललेल्या नृत्याविष्कारांपासून कोळी अन् गोंधळी या लोकगीतांच्या धमाकेदार परफॉर्मन्सनी नुकतच मिस अॅंड मिसेस पनवेलचे ऑडीशन्स जल्लोषात पार पडले.
मॉडेलिंग आणि फॅशन क्षेत्रात गुणवान होतकरू मॉडेल्स यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिर्के डेकोरेटर्स अॅंड इव्हेंट्सने ‘मिस अँड मिसेस पनवेल 2018’, या सौंदर्यवती स्पर्धेची घोषणा काही दिवसांपुर्वीच केली होती आणि 18 ऑगस्टपासून सुरू झालेल्या या स्पर्धेच्या ऑडिशन्सलाही तुफान प्रतिसाद मिळाला. कलरफुल कॉश्चुम्सनी रंगारंग झालेलं वातावरण…सौंदर्यवतींचा रॅम्पवॉक…आणि सोबतीला कडक परफॉर्मन्सेसनी ‘मिस अॅंड मिसेस पनवेल 2018’ सोहळ्याची संध्याकाळ तुफान रंगली. ‘मिस अॅंड मिसेस पनवेल 2018 ’च्या किताबासाठी एकूण 300 पेक्षा जास्त सौंदर्यवतींमध्ये तगडा मुकाबला झाला. परीक्षकांनी सौंदर्याबरोबरच या तरुणींच्या बुद्धिमत्तेचीही कसोटी पाहिली. हा सोहळा पाहण्यासाठी खास आलेल्या प्रेक्षकांकडून स्पर्धकांना चिअरअप केलं जात होतं. पनवेलसह आसपासच्या भागातील मिस आणि मिसेसनी सूर, लय आणि तालचा अनोखा मिलाफ घडवत शनिवार आणि रविवारच्या दिवशी हॉटेल वीर रेसिडेन्सीच्या सभागृहात धमाल केली.
ग्लॅमर जगतात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना योग्य तो प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी ‘शिर्के डेकोरेटर्स अॅंड इव्हेंट्स’चे भूषण शिर्के आणि ऋषी धुमे यांनी ‘मिस अॅंड मिसेस पनवेल 2018’ ही सौंदर्य स्पर्धा सुरु केलीये. तब्बल दोन दिवस रंगलेल्या या ऑडीशन्समध्ये जेव्हा मोठ्या मोठ्या स्पर्धांचे किताब आपल्या नावे केलेले स्पर्धक परफॉर्म करताच सर्वांचा जल्लोष टिपेला पोहोचत होता. काही महिला आणि मुलींनी तर ‘मधुबाला ते माधुरी’ यांच्यावर चित्रीत मुजरा गीतांच्या सादरीकरणाने परिक्षकांच्या मनाच्या तारा छेडल्या.
अॅक्टींग, डान्स, फॅशन, गाणं असे विविध कलागुण असलेल्या मुलींसाठी आ्रणि महिलांसाठी देखील हा प्लॅटफॉर्म जादूई ठरतोय.. निवडीपासून ग्रुमिंग, इन्ट्रोडक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, फिटनेस हेल्थ केअर, फोटोशूट, ग्रँड रिअर्सल आणि फायनल या अशा सगळ्या टप्प्यामधून मिस अॅंड मिसेस पनवेल ची ही स्पर्धा रंगणारेय. त्यामुळे तरूणीं आणि महिलांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. मिस अॅंड मिसेस पनवेल ही केवळ ब्यूटी काँटेस्ट नाही, तर पर्सनालिटी काँटेस्ट आहे. व्यक्तिमत्त्व, प्रतिभा, कलागुण, हजरजबाबीपणा आणि बुद्धिमत्ता या जोरावर अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत. या निकषांमुळे केवळ मॉडेलिंग क्षेत्रातच नाही, तर गायन, अभिनय, नृत्य या क्षेत्रांतही मुली आणि महिलांसाठी मिस अॅंड मिसेस पनवेलच्या व्यासपीठामुळे करिअर दालन खुलं होणारंय. दिग्गज परीक्षक आणि ग्रूमिंग एक्सपर्टमुळे स्पर्धकांना कलाकार म्हणून स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळणारेय. इथे फक्त गायन, नृत्य किंवा अभिनय याच कलांना व्यासपीठ मिळतं असं नाही, तर नकलाकार, रांगोळीकार, चित्रकार, अँकर, शिल्पकार अशा कोणत्याही कला दोन मिनिटांच्या टॅलेंट राउंडमध्ये सादर करण्याची परवानगी आहे. ओळख, टॅलेंट राउंड आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सेमी फायनलसाठी स्पर्धक निवडले जाणारेत. 30 सप्टेंबर रोजी या स्पर्धेची सेमी फायनल रंगणार आहे.
मिस अॅंड मिसेस पनवेल या स्पर्धेतील सर्वच स्पर्धक या अफलातून होत्या. त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता. या स्पर्धेत आलेल्या मुली आणि महिला पोटेन्शिअल दिसून आल्या. कोणत्याही ठराविक साच्यातली उत्तरं न देता स्वतःच्या मनाला पटतील ती उत्तरं धडकपणे देण्याचा आत्मविश्वास या मुली आणि महिलांकडे होता.
मॉडेलिंगविषयी आजही आपल्याकडे थोड्या साशंकतेने पाहिलं जातं. पण ‘शिर्के डेकोरेटर्स अॅंड इव्हेंटने’ ही स्पर्धा आयोजित करत असल्याने पालकांनी विश्वासाने त्यांच्या मुली आणि महिलांना या स्पर्धेत पाठवलं आणि त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. आज या स्पर्धेचं वातावरण एखाद्या लग्नसमारंभाच्या उत्साहासारखं आहे. आयोजक, स्पर्धक आणि प्रेक्षक यांना तो आपलाच कार्यक्रम वाटतो, हेच या स्पर्धेचं यश आहे.