• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 6, 2018

जामिनाचा अर्ज फेटाळल्याने नामदेव भगत फरार

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नगरसेवक नामदेव भगत यांना जामिन मंजूर

कामिनी पेडणेकर – मुंबई

* शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या भूमिकेकडे आता लक्ष

* राम कदमांवर टीका करणारे उध्दव ठाकरे भगतप्रकरणी काय करणार?

* नामदेव भगत यांचा नवी मुंबई पोलिसांकडून शोध सुरू

नवी मुंबई : विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेले शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांचा अलिबाग सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन ६ सप्टेंबर (गुरूवारी) रोजी झालेल्या सुनावणीनंतर रद्द केला आहे. सदर गुन्ह्यात पोलिसांची अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून नामदेव भगत यांनी २१ ऑगस्ट रोजी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावेळी न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर करुन ६ सप्टेंबर रोजी जामीनावर सुनावणी ठेवली होती. दरम्यान, अंतरिम जामीन रद्द झाल्याने फरार आरोपी नामदेव भगत यांचा नवी मुंबई पोलिस शोध घेत आहेत.

शिवसेना नगरसेवक, सिडकोचे माजी संचालक आणि शिवसेनेचे गोवा राज्य सहसंपर्कप्रमुख नामदेव भगत यांनी नेरुळ गावात राहणार्‍या एका १९ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन ३५४ कलमान्वये उरण पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर त्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर ६ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने त्यांना दिलेला अंतरिम जामीन रद्द करत जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, नामदेव भगत यांना कोणत्याची क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. जामीन अर्ज फेटाळल्याने पोलीस शिवसेना नगरसेवक नामदेव भगत यांच्या शोधात आहेत.

नामदेव भगतप्रकरणामुळे शिवसेना चांगलीच अडचणीत आली. कालच भाजप आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर टीकेची झोड शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केली होती. नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवक नामदेव भगतप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे राजकीय घटकांचे लक्ष लागून राहीले आहे. शिवसेनेचे आणखी एक मातब्बर प्रस्थ महिलाप्रकरणात जामिनावर बाहेर असल्याने त्याच्याही फाईल लवकरच उघडणार असल्याची नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Previous Post

अतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करा!: विखे पाटील

Next Post

भाजपाचा खिलजी ह’राम’ कदमला उखडून फेका – उद्धव ठाकरे

Next Post
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविणे म्हणजे सांगली-जळगावच्या निवडणुका जिंकण्याइतके सोपे नाही- उद्धव ठाकरे

भाजपाचा खिलजी ह'राम' कदमला उखडून फेका - उद्धव ठाकरे

राम कदमांवर तोंडसुख घेणारे उध्दव ठाकरे नवी मुंबईतील भगत प्रकरणावर मुग गिळून का बसले आहेत?

मूषक नियत्रंण कामगारांचे वेतन पुन्हा रखडले

स्वातंत्र्यदिन गेला, रक्षाबंधन गेले, गणपती जवळ आले, पगार भेटणार तरी कधी?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com