· कोकणवासियांच्या मेळाव्यात राज ठाकरे आक्रमक
· रस्त्याच्या कंत्राटांबाबत मनसैनिकांना दिले आदेश
· आपल्या जमिनी देवू नका, सावध राहा
मुंबई : कोकणात जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी आक्रमक भूमिका घेतली. हजारो कोटी रुपये खर्च करुन रस्ते बांधले जातात. पण तरीही रस्त्यांची दुर्दशा का होते?, हजारो कोटी रुपये कंत्राटदाराच्या घशात घालायला दिले जातात का? असा सवाल विचारतानाच या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.सर्व कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देताना जपून जा आणि जपून परत मुंबईला या, असा सल्लाही राज यांनी कोकणवासियांना दिला.
मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणवासीयांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केले. कोकणातील रस्त्यांवरुन त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. हजारो कोटी रुपये खर्च करून रस्ते बांधले जातात तरीही रस्त्यांची दुर्दशा का?, यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाल तेव्हा या कंत्राटदारांना मनसेच्या शैलीत जाब विचारावा, असे त्यांनी सांगितले.
नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता हातात असताना तिथे जे रस्ते बांधले गेले ते अजूनही खड्डेविरहित आहेत. का? कारण कंत्राटदारांना तशी तंबी देऊन ठेवली होती, असे त्यांनी नमूद केले.
सणानिमित्त कोकणातील ‘गावी जाताय. सुखरूप जाऊन या. प्रवास करताना इतर कुणी अडचणीत असेल तर मदत करा. गावोगावी असलेल्या महाराष्ट्र सैनिकांच्या पाठीशी ठाम उभे राहा,’ असे आवाहनही त्यांनी केले. कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्
राज ठाकरेंनी मेळाव्याचे भाषण सुरू करण्यापूर्वी आंबेनळी दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर, कोकणवासी हेही कोकणातील रस्त्यांप्रमाणेच वळणवळणाचे आहेत, असे म्हटले. तर कोकणातील जमिन हे वैभव असून शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मात्र, सर्वच राजकीय पक्षांनी कोकणाकडे दुर्लक्ष केले. कोकणातील जमिन परप्रांतीय बळकावत आहेत, त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे राज यांनी म्हटले. कोकण ही भारतरत्नांची भूमी आहे. एकट्या दापोलीतून ४ भारतरत्न देशाला मिळाले आहेत, असेही राज यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या भूमीने आतापर्यंत काय काय दिले. देशातल्या अनेक राज्यांमधून भारतरत्न देतात. महाराष्ट्राला जी आठ भारतरत्न मिळाली आहेत. पा वा काणे, धोंडू केशव कर्वे, विनोबा भावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, भीमसेन जोशी आणि जे आर डी टाटा महाराष्ट्रातल्या या मान्यवरांना भारतरत्न मिळाला आहे. त्यापैकी एकट्या दापोली तालुक्यात चार भारतरत्न आहेत. ज्या कोकणाने भारताला महान माणसे दिली आहेच आणि आम्ही फक्त गणपतीला गावाला जाऊन येतोय, असे राज ठाकरे म्हणाले.
अनेक आमदार, खासदार तिथून आले. कोकणाची वाट लागू शकते, असे प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कोकणाची जमीन ही त्यासाठी नाही, ते प्रकल्प दुसरीकडे हलवता येतात. कोकणची भूमी हे केरळसारखीच आहे. पर्यटनात केरळच पुढे जाऊ शकतो, मग आपले कोकण का नाही? पण हा विचार करतच नाही. या गोष्टी करण्यासाठी राजकीय बळ लागतं, असेही राज ठाकरे यांनी सुनावले.