स्वयंम न्यूज ब्युरो
नवी मुंबई ़: सोमवारी पाच दिवसाचे गणेश विसर्जन करताना गणेश भक्तांचे हाल झाल्याच्या घटना ठिकठिकाणी पहावयास मिळाल्या. घरातील तसेच सार्वजनिक गणपी पाण्यात विसर्जन होत असतानाचेही घरातील तसेच मंडळातील सदस्यांना पहावयास मिळाले नाही. महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर आणि पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याच्या मागणीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा फटका गणेश भक्तांना बसला आहे. विसर्जन ठिकाणी भाविकांनी उघडपणे आपला संताप बोलूनही दाखविला आहे.
ठिकठिकाणच्या मैदानावर अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव कालावधीत गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनविण्याची मागणी करत महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर आणि पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावाही केला होता. कृत्रिम तलावांची निर्मिती केल्यास घरगुती गणेश मूर्त्यांचे विसर्जन त्याच ठिकाणी होईल व तलाव परिसरात वाहतुकीची कोंडी व भाविकांची गर्दीही होणार नसल्याचे महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर आणि पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी लेखी निवेदनातून सतत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणूनही दिले होते. तथापी पालिका प्रशासनाने या मागणीकडे कानाडोळा करत उदासिनता दाखविली.
सोमवारी जुईनगर येथील चिंचोली तलावावर पालिकेच्या स्वंयसेवकांनी गणेश मूर्ती घेवून येणार्यांनाच विसर्जन ठिकाणी प्रवेश दिला जात होता. त्यामुळे घरातील सदस्यांना व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन यंदा पाहताही आले नाही. त्यातच अनेक गणेश मूर्त्यांचे दागिने मूर्तीवरच असल्याचे भाविकांच्या लक्षात आल्यावर त्यांना विसर्जित ठिकाणी मूर्तीजवळ जाण्याकरिताही स्वंयसेवकांशी हुज्जत घालावी लागली. त्यातच पालिकेने उभारलेल्या मंडपाच्या ठिकाणी राजकारणी व त्यांच्या कार्यकर्त्यांची असलेली गर्दी याचाही फटका गणेश भक्तांना बसला. महापालिका ‘ब’ प्रभाग समिती सदस्य मनोज यशवंत मेहेर आणि पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी केलेल्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देवून कृत्रिम तलाव बनविले असते तर तलाव ठिकाणी गर्दी व तलावाच्या बाहेरील रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली नसती, अशा प्रतिक्रिया गणेश भक्तांकडून व्यक्त केल्या जात होत्या.